कंधार ;( दिगांबर वाघमारे )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक लातुर यांच्या वतीने
माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली होती त्याचा निकाल दि .२ मे रोजी जाहीर झाला त्यात कु.फबिहा तझिन मोहम्मद सिकंदर हिने सुमारे ५०० पैकी ४६० गुण घेत शेकडा ९२ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले .
प्रियदर्शिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कंधार विद्यालयाचे दहावी परीक्षेत सय्यद नुसरा अहेमद अली हिने ४६८ गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे तर फबिहा तझिनने ४६० गुण घेत दुत्तिय तर उबाळे विद्या विजय हि ४५९ गुण घेत शाळेत तिसरी तर सय्यद वजिहा नुर मोहम्मद हिला ४५१ टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले .
प्रियदर्शिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालया चा ८१ . ५ टक्के निकाल लागला असून विशेष प्राविण्यात १५ विद्यार्थीनी. प्रथम श्रेणीत २० विद्यार्थीनी.द्वितीय श्रेणीत -११ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले आहेत,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अध्यक्ष व संस्थापक मा.आ. ईश्वररावजी भोसीकर , सचिव संजय भोसीकर, प्राचार्य राजेंद्र भोसीकर, प्राचार्य मा.किरण बडवणे,माजी जि प सदस्या वर्षाताई भोसीकर,संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा भोसीकर,महेश भोसीकर, अधिक्षक मोहण तपासे यांच्यासह सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.