मुरमाची चोरी निदर्शनास आणून देऊनही कार्यवाहीचे धाडस नाही

कार्यवाही करा अन्यथा अंदोलन – राजु पाटील

बिलोली प्रतिनिधी .नागोराव कुडके

दि.१ सप्टेंबर

शासनाच्या मालमत्तेची योग्यरीत्या जपवणूक करून शासनाचा महसुल वाढविणे प्रशासनातील संबंधित विभागाची ती जबाबदारी आहे.असे असून सुद्धा स्थानिक प्रशासनातील कांही निवडक अधिकारी व कर्मचारी यांनी तहसिलदाराच्या आदेशाचे पालन न करता कांही वेळा तर तहसिलदाराची दिशाभुल करून आपल्या अधिकाराचा स्वतःच्या भल्यासाठी कसा दुरउपयोग करतात यांचा प्रत्येय सध्या बिलोली तालुक्यातील माळरानाच्या पायथ्याशी होत असलेल्या अवैध्य मुरम उत्खननाच्या माध्यमातून येत आहे. अवैध उत्खनन करणा-यावर कार्यवाही करा अन्यथा विविध न्यायिक मार्गाने अंदोलन छेडण्याचा ईशारा अ.भा.भ्र.नि. समितीचे प्रदेश सरचिटणीस तथा समाजसेवक राजु पाटील शिंपाळकर यानी मुख्यमंञ्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

गेल्या कांही महिण्या पासून तालुक्यात विविध ठिकाणी परवान्याच्या नावाखाली अवैध मुरुम ऊत्खन्न जोमात चालु आसुन आसाच विनापरवाना मुरुम ऊत्खन्न झाल्याचा प्रकार तोरणा येथे घडला आसुन तोरणा येथे प्रतिक कंट्रक्शन कंपनी मार्फत रस्त्याचे काम चालु आसुन.सदर गुत्तेदाराचे नातेवाईक हे नांदेड येथे महसुल विभागात एका वरीष्ठ पदावर कार्यरत असल्याचे समजते.नेमका या पदाचा गैरफायदा घेऊन सदर गुत्तेदाराने मुरुम उत्खननाची रितसर परवानगी न घेता बेसुमार मुरमाचे अवैध्य उत्खनन करुन सदर कामासाठी वापरत आसताना ही बाब संबधित तलाठी व नायब तहसिलदार (महसुल ) याना वेळोवेळी मुरुमाची चोरी होत आसल्याची माहीती देऊन देखिल संबंधितांनी कार्यवाही करण्याचं धाडस दाखवत नसून यामुळे शासनाचे लाखो रुपयाचे महसुल पाण्यात जात आहे.या तक्रारारीची माहीती गुत्तेदाराला दलाला मार्फत समजल्या नंतर गुत्तेदाराने मोठ्या हुशारीने रोडवर टाकुन ठेवण्यात आलेला मुरमाचा साठा सदर रोडवर पूर्ण पणे पसरवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.हा खेळ संपल्या नंतर गावकर्याचे व तक्रारदार यांचे समाधान करण्यासाठी नंतर सदर गावचे तलाठी सोनुले हे जाय मोक्यावर जाऊन फक्त साठ ब्रासचा पंचनामा केल्याचे समजते.वास्तविक पाहता शेकडो ब्रास मुरमाची चोरी झाल्याचे गावकरी सांगत आसताना संबंधित तलाठी सोनुले व गुतेदारानी चोरीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आसल्याचे दिसुन येत आहे.करीता या बाबतची योग्य ती चौकशी करुन संबधीतावर कार्यवाही करावी अन्यथा दि.९ सप्टेंबर रोजी तहसिल कार्यालय येथे विविध आंदोलनाच्या माध्ममातुन आवाज ऊठवू आशा तक्रारीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे राज्य सरचिटनिस तथा सामाजिक कार्यकर्ते राजु पाटील शिंपाळकर यांनी दि.३१ आँगस्ट रोजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे याच्याकडे मार्फत तहसिलदार यांना देण्यात आले तर कर्तव्यदक्ष तहसिलदार विक्रम राजपुत काय कार्यवाही करतात याकडे अनेकांचे लक्ष लागुन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *