कुरुळा येथून पायी दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान

 

 कंधार ; ॲड.उमर शेख

वारकरी संप्रदायाची कुरुळा ते पंढरपूर पायी दिंडी ह.भ.प.आनंद महाराज तुकाराम चिवडे कुरुळेकर यांची दिंडी कुरुळा येथून 11 जून 2023 रोजी रविवार पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे.

166 वर्षाची परंपरा लाभलेल्या या पायी दिंडीची सुरूवात वारकरी संप्रदायाचे कै. हणमंतराव महाराज चिवडे पाटील यांनी केली. त्यानंतर लक्ष्मण महाराज चिवडे कुरुळेकर , त्यानंतर कै. तुकाराम महाराज लक्ष्मण चिवडे कुरुळेकर, कै. ज्ञानोबा माऊली महाराज कुरुळेकर, यांनी पायी दिंडी ची परंपरा चालवली तसेच हीच परंपरा मागील काही वर्षांपासून आनंद महाराज तुकाराम चिवडे कुरुळेकर हे चालवत आहेत.

कुरुळा व कुरुळा परिसरातील सर्व भावकी भक्त वारकऱ्यांनी पायी कुरुळा ते पंढरपूर जाणाऱ्या दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन दिंडी प्रमुख आनंद महाराज तुकाराम चिवडे कुरुळेकर यांनी केले.
ही पायी दिंडी कुरुळा – शिरूर – लातूर – बार्शी मार्ग पंढरपूर मुक्कामी जाते. गावनिहाय वेळेपत्रक खालील प्रमाणे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *