माजी आमदार भाई गुरुनाथ कुरुडे यांचा हंसते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कंधार ; प्रतिनिधी
लातूर बोर्डा मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक विद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्या परीक्षेत श्री शिवाजी उर्दू माध्यमिक विद्यालयाची अमेना बेगम हिने ९४.२० टक्के गुण घेऊन उर्दू विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवीला. श्री.शिवाजी उर्दू माध्यमिक विद्यालयाचा ९६ टक्के निकाल आहे.
श्री.शिवाजी उर्दू माध्यमिक विद्यालयाची विध्यार्थी अमेना बेगम मिर्झा हिदायत बेग ९४.२० टक्के गुण घेऊन उर्दू विभागातून प्रथम क्रमांक मिळवला त्यानी विज्ञान मध्ये १०० पैकी ९९ गुण मिळवले तर वसमी रोमान अफसर पठाण ८८.४० टक्के गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळवला आहे. आयमन कशफ मोहम्मद. रफिख – ८६.४० टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक मिळवला तर गुणवंत विद्यार्थी ईलसा महेवीश सगीर खान पठाण – ८५.२० टक्के गुण मिळविले, जवेरिया फातिमा मोहम्मद खालीलउल्ला- ८४.६० टक्के, तूमन्ना अहेमद खान पठाण -८१.६० टक्के, आहेरार तरुणनुम ८०.६० टक्के गुण मिळवले
लातूर बोर्डात संस्थेचा व शाळेचा नाव उज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था चे अध्यक्ष पुरुषोत्तम केशवराव धोंडगे,सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे ,सह सचिव मुक्तेश्वर केशवराव धोंडगे, शालेय समिति अध्यक्ष लीलाताई अंबटवाड, यानी शुभेच्छा देले .
शाळा चे विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर शिंदे पाटील, डॉ. तायडे , मुख्याध्यापक सदाशिव आंबटवार, उप प्राचार्य एस.टी वडजे, उपमुख्याध्यापक , पर्यवेक्षक रमाकांत बडे, तुकाराम कारागीर, उर्दू जुनिअर विभाग प्रमुख मिर्झा हिदायत, बेग मुनीर मोयोदिन, उपस्तितीत होते. या विद्यार्थ्यांना सईद सरवरी, शेख शब्बीर सर , जरीना अंजुम, मसियोद्दीन सर., मिर्झा जमीर बेगसर , म.सिराज उल हक्क सर,नविद सर, या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.