डॉ. दिलीपराव पुंडे यांचे शालेय जीवनातील भाषणाने प्रेरित होऊन मी डॉक्टर झालो.. ;डॉ. श्रीहरी बुडगेवार यांचा मुक्त संवाद

डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार (MD Radiologist) हे मुखेड तालुक्यातील जांब (बुद्रुक) येथील एका व्यावसायिकाचे सुपुत्र. डॉ.श्रीहरी हे जांब येथील नितीन निकेतन विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेमध्ये जांबचेच भूमिपुत्र मुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे साहेब यांचे व्याख्यान आयोजित केले होते, त्यांचे व्याख्यान ऐकून आपणही पुंडे साहेबासारखा डॉक्टर व्हावा हे श्रीहरी यांच्या मनावर कोरले गेले.

 

डाॅ.श्रीहरी यांना पुढे शिक्षण द्यावे अशी वडीलाची तीव्र इच्छा नव्हती आपला व्यवसाय सांभाळण्यापुरते शिक्षण जरी श्रीहरीने घेतले तरी पुरे आहे असे त्यांना वाटायचे परंतु बालवयापासूनच डॉ. श्रीहरी चौकस वृत्तीचे. वडीलाची इच्छा नसतानाही त्यांनी शिक्षण घेण्यासाठी पुढे सरसावले. डॉ.श्रीहरी हे अभ्यासामध्ये नेहमी दिसायचे नाहीत परंतु वर्गामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी दुसऱ्याकडे कधीही जाऊ दिला नाही. एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी एमडी रेडीयाॅलाॅजिस्ट झाले.

 

 

यानंतरही त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक पदव्या विशेष प्राविण्यसह मिळविल्या. आपल्या शिक्षणाचा लाभ आपल्या मातीतील लोकांना झाला पाहिजे या उद्देशाने मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांच्या सल्ल्याने त्यांनी आध्या डायग्नोस्टिक्स सेंटर हे मुखेड येथे उघडले. यापूर्वी मुखेड मध्ये सोनोग्राफी करण्याची सोय नव्हती परंतु विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी ग्रामीण भागातील लोकांसाठी सोनोग्राफी सोय उपलब्ध करून दिली होती कालांतराने ते राजकारणात आल्यामुळे त्यांचे सर्व सेंटर बुडगेमवार यांच्या स्वाधीन केले डॉ.श्रीहरी बुडगेवार साहेबांनी त्यात भर टाकून नांदेडला ज्या तपासण्या होतात त्या सर्व तपासण्या मुखेड तालुक्यातील व परिसरातील लोकांसाठी माफक दरात खुल्या करून दिल्या.

 

आजपर्यंत बुडगेमवार साहेबांनी हजारो रुग्णांची सोनोग्राफी ही मोफत केलेली आहे हे विशेष. कुठल्याही गोरगरीब रुग्णांना ते आजही फीस घेत नाहीत. त्यांनी मुखेड सारख्या ठिकाणी सिटीस्कॅन मशीन सुरू करण्याचे धाडस केले. आपल्या जवळील सर्व दागिने गहाण ठेवून त्यांनी व्याजावरती अनेक मशीन खरेदी केल्या हे विशेष. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या गाड्या आहेत, त्यांना हा छंदच आहे वेगवेगळ्या गाड्या हाताळत अत्यंत चैतन्यमय जीवन जगणारा एक डॉक्टर म्हणून या पंचक्रोशीत त्यांचे नावलौकिक आहेत. दिवसातील ते बारा तास काम करतात हे सर्व करत असताना कायद्याचा अभ्यास असावा यासाठी त्यांनी कायद्याचा अभ्यासही सुरु केला आहे. अफलातून व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. श्रीहरी बुजगेमवार साहेब यांच्या आध्या डायग्नोस्टिक सेंटर, सिटीस्कॅन व पॅथॉलॉजीलॅब चे उद्घाटन मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि. ९ जून २०२३ रोजी संपन्न झाले. त्यांच्या या सर्व प्रगतीत त्यांच्या अर्धांगिनी सौ. अनुषा श्रीहरी गुडगेमवार ( MBA Hospital Management) यांचे मोलाचे सहकार्य आहे, त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा!

*-दादाराव आगलावे*
मुखेड.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *