महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर येथील शाळेचे घवघवीत यश

नांदेड ( प्रतिनिधी ) येथील महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल ८९.४०% लागला आहे.विशेष प्रविण्य मिळविणारे ३१ विद्यार्थ्यी , प्रथम क्रमांक श्रेणित प्राप्त ४० विद्यार्थ्यी, द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यी २० , तिसऱ्या श्रेणित ०८ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले असून एकुण १११ विद्यार्थ्यापैकी ९९ विद्यार्थ्यी उत्तीर्ण होऊन शाळेचे नावलौकिक प्राप्त करून दिल्याबद्दल

 

मराठवडा महात्मा फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा दलित मित्र आदरणीय पंढरीनाथ पुंडलिकराव केंद्रे , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय अमोलभाऊ केंद्रे , शाळेतील मुख्याध्यापक श्री.भारत माधवराव कलवले. सर्व सहशिक्षक व शिक्षकेतरकर्मचारीवर्ग, पालक व परिसरातील नागरिक यांच्याकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *