कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हेवेली येथे अक्षय भालेराव याचा खुण झाल्या प्रकरणी त्याला व त्याच्या कुटुंबीयास न्याय मिळवून देण्यासाठी कंधार येथील शाकीय विश्राम गृहात समस्त बहुजन बांधवांची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये दि. 12 जुन सोमवार रोजी कंधार तहसील कार्यालयासमोर समस्त बहुजन बांधवांच्या वतीने निदर्शने करण्याचे ठरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,नांदेड जिल्ह्यापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या बोंढार हेवेली या गावी दिनांक 1 जुन रोजी लग्नाच्या वरातीत काही लोकांनी षडयंत्र रचुन अक्षय भालेराव याच्यावर धार धार शास्त्राने वार करून त्यांचा निर्घृण खुण केल्या प्रकरणी संपुर्ण महाराष्ट्रात याचे चांगलेच पडसात उमटत आहेत.अक्षयला न्याय मिळावा व त्याच्या कुटुंबीयास शासनाने आर्थिक मदत करावी अश्या विविध मागण्यांसाठी 12 जुन सोमवार रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे.तेव्हा हजारोंच्या संख्येने या निदर्शनाला कंधार तालुक्यातून समस्त बहुजन समाजाने उपस्थित रहावे. असे आवाहन मयुर कांबळे,वंचित चे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, माजी नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे, माजी नगरसेवीका अनिता कदम,वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा साधनाताई एंगडे,सचिन भाऊ जारीकोटे,नवनाथ भाऊ बनसोडे,शेख रब्बानी,कपिल जोंधळे,प्रेमानंद गायकवाड,मारोती मामा गायकवाड,प्रदीप येवतिकर,सचिन पट्टेकर,बबन जोंधळे,विनोद कांबळे,संभाजी कांबळे,राज कांबळे,बाळू धुतमल,सागर कदम,मयुर कदम,राहुल कदम,शेख एजाज,वैभव वाघमारे,धोंडीबा सोनकांबळे,मुन्ना वाघमारे,कुलदीप जोंधळे,पिंटू जोंधळे,विजय कांबळे,किरण जोंधळे,सुनील कांबळे,सूरज सूर्य,आकाश कदम,किरण आगबोटे,अर्जुन जोंधळे,विहान पाटील कदम,प्रवीण कांबळे दिग्रसकर,नितीन कांबळे दिग्रसकर,आदींच्या वतीने करण्यात आले आहे.