शेकापूर सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी शिवाजीराव पाटील केंद्रे तर व्हाईस चेअरमन पदी  गोविंद गर्जे यांची बिनविरोध निवड .

कंधार:- ( एस पी केंद्रे )

शेकापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणुक गेल्या आठवड्यात पार पडली.या निवडणुकीत शेतकरी शेतमजूर सहकार विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले होते.दिनांक 8जुन रोजी चेअरमन  निवडीची प्रक्रिया पार पडली यामध्ये चेअरमन पदी शिवाजीराव पाटील केंद्रे तर व्हाईस चेअरमन पदी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे समर्थक  गोविंद गर्जे यांची बिनविरोध निवड .

कंधार तालुक्याचे लक्ष लागलेल्या शेकापूर सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीमध्ये शेतकरी शेतमजूर सहकार विकास पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले होते
शेकापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत,शेतकरी शेतमजूर सहकार विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले होते त्यामधुन मा.जिल्हा परीषद सदस्य तथा मा.उपसभापती पं.स.कंधार संभाजीराव पाटील केंद्रे यांचे चिरंजीव चेअरमन पदी मा शिवाजी संभाजीराव पाटील केंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर आमदार शामसुंदर शिंदे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब गर्जे यांचे बंधु गोविंद भानुदास गर्जे यांची व्हा चेअरमन पदी  बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच  चेरमन व व्हा.चेरमन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देऊन   पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.तथा निवडुन आलेले उमेदवार यांचे  कंधार पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा जि.प.सदस्य संभाजीराव पाटील केंद्रे व प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे, प्राचार्य किशनराव व्यंकटराव डफडे व शेकाप ता अध्यक्ष मा.सरपंच बाळासाहेब गर्जे यांनी तेरा ही उमेदवार यांचे पुष्पहार घालून स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवडणूक यशस्वी करण्यासाठी शेकाप ता अध्यक्ष मा. बाळासाहेब गर्जे  , प्रभाकर केंद्रे, विश्वनाथ गर्जे, मा.सरपंच ज्ञानोबा माऊली घुगे, प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे, चेतन केंद्रे,  मधुकर मंगनाळे उपसरपंच खुशाल तांबोळे ग्रा.प. सदस्य राजीव केंद्रे , पत्रकार एस पी केंद्रे, श्रीराम डफडे, धनराज डफडे, ज्ञानोबा डफडे सर ,केशव कदम , मोरेश्वर मोरे,रमेश कदम, त्रिभुवन मोरे, रंगनाथ जाधव, बालाजी मुंडे, अरुण केंद्रे,मा.उपसरपंच परमेश्वर घुगे, सुर्यकांत केंद्रे सर , संभाजी केंद्रे पोलीस पाटील , वैजनाथ गर्जे सर , शेषराव गर्जे,प्रदिप मंगनाळे, आदिने सहकार्य केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बालाजी बोधगिरे   ,वरताळे साहेब , सचिव संजीव कुमार तेलंग यांनी काम पाहिले.
बिनविरोध निवड झाल्याबद्दल दीपक आवाळे, आत्माराम लाडेकर ,बळीराम पवार, विक्रम मंगनाळे, सतीश देवकते, उत्तम चव्हाण ,राजाराम डफडे ,मारुती पंढरे, सुधाकर कांबळे, परमेश्वर जाधव, धनराज उर्फ बाळू पाटील लुंगारे, बाबुराव पाटील गिरे, परमेश्वर जाधव, संभाजी पाटील लाडेकर, आनंद लुंगारे, साईनाथ घाटोळ, नितीन कोकाटे, गोविंदराव पाटील मोरे, राजू पाटील जाधव सरपंच, विलास केंद्रे, सुभाष भालेराव, आनंद लुंगारे ,मुन्ना शिरसीकर आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तथा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *