“सहित्याकडून समाजसेवेकडे”हे ब्रीद जोपासलेले कवी विचार मंच शेगाव या समुहाद्वारे आयोजीत ओळख साहित्यिकांची या उपक्रमात आज आपण अश्या एका साहित्यिकेची ओळख करून घेणार आहोत की,ज्या पत्रकार सुद्धा आहेत.असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे रुपाली वागरे/वैद्य.
नांदेड येथील जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयामध्ये बी. एस. डब्ल्यू.(बॅचलर आॅफ सोशल वर्क) समाजकार्य या विषयाचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर रूपाली ताई यांनी M.J( मास्टर ऑफ जर्नालिझम व मास कम्युनिकेशन) या विषयातील स्नातकोत्तर पदवी नांदेड येथील श्री.गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय,स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ मधून घेतली.त्या नांदेड येथील मुळच्या रहिवासी असुन रूपालीताई वागरे विवाहानंतर सौ. वैद्य झाल्या. विवाह नंतर पुढे पतीच्या प्रोत्साहनामुळे रूपालीताई यांनी नांदेड येथे वृत्तपत्रांमध्ये पत्रकारीतेला सुरुवात केली. रूपालीताई पत्रकारिते शिवाय साहित्य क्षेत्रातील सप्तरंगी साहित्यमंडळ महाराष्ट्र महिलाराज्य प्रमुख या पदावर कार्यरत आहेत. रूपालीताई यांची एक कांदबरी व कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून, काही दिवसातच त्या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करणार आहेत.आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रात, रोजचे दिनविशेष व लेख प्रकाशित झाले असून विविध दिवाळी अंकात त्यांच्या कथा,कविता,आणि ललीत लेख सुद्धा प्रकाशित होत असतात.विविध साहित्यीक गृपवर त्या परिक्षकाचे कार्यदेखील करतात.त्याचप्रमाणे नांदेड आकाशवाणी केंद्र,परभणी आकाशवाणी केंदावरुन त्यांचे सामाजिक,प्रासंगीक विषयावरचे कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत.वास्तवादी आणि स्त्रीवादी लिखाणाची दखल घेत त्यांना “राज्यस्तरीय सावित्रीबाई ज्ञानज्योत पुरस्कार २०२०”(राज्यमंत्री दर्जा ज्योती ठाकरे यांच्या हस्ते प्राप्त झाला),मांजरम येथे”शिवजयंती” निम्मित “युवा जिवन गौरव २०२०”पुरस्कार,जीवन मांजरमकर यांनी अॅड.विजय गोणारकर आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.अक्षरोदय साहित्य मंडळ,महाराष्ट्र श्री.सदानंद सपकाळे(अक्षरोदय साहित्य मंडळ राज्याध्यक्ष)यांनी “जागतिक महिला दिनानिम्मित””अक्षरोदय महिला गौरव-२०२० हा पुरस्कार प्रसिध्द साहित्यीक संध्या रंगारी आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकांच्या शब्दात चिंब भिजत असतांना त्यांना दै.प्रजावाणीच्या”मानसी”तर्फे”संरक्षक सखी”सन्मान सोहळ्यात मा.विजयकुमार मगर(पोलिस अधिक्षक नांदेड),आणि मा.मनोजकुमार लोहिया(विशेष पोलिस महानिरिक्षक,नांदेड),संपादिका अनुजाताई डोईफोडे,अॅड.दिपा बियाणी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित मा.विजयकुमार मगर यांच्या हस्ते “उकृष्ट लेखिका”म्हणून गौरवीण्यात आले. नांदेड आकाशवाणीच्या “घर संसार”कार्यक्रमाच्या निवेदिका विद्या जमदाडे/गोयल यांनी रुपालीताईच्या साहित्याची दखल घेत नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन “माझा लेखन प्रवास”या शिर्षकाखाली मुलाखत प्रसारित केली.
जीवा संघटनेच्या वतीने महिलाशक्ती गौरवपुरस्कार(२०२०),
फूले-आंबेडकरी विचारधारेचा उत्कृष्ट लेखिका पुरस्कार(२०२२),हा पुरस्कार माझी सनदी अधिकारी अनिल मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.दुसरे ग्रामीण जनसंवाद साहित्य संमेलन,(जवळा दे.) येथे प्रसिध्द साहित्यीक डाॅ.राम वाघमारे यांच्या हस्ते
क्रांती ज्योती साहित्यरत्न पुरस्कार-(२०२३) प्राप्त झाला.या सर्व पुरस्कारासोबतच त्यांना
विविध सामाजीक संस्था आणि गोदावरी अर्बन बॅकेतर्फै महिलादिना निम्मित सन्मानित केले आहे.हातात पडेल ते वाचून काढणे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय यासारख्या विषयावर लिखाण करणे यावर त्यांचा हातखंड आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनात आणून देणे, त्याचबरोबर सरकारच्या चुकीच्या ध्येय, धोरणावर टीका करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, अशा प्रकारचे समाज उपयोगी लिखाण रूपालीताई पत्रकारितेच्या माध्यमातून सतत करीत असतात आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतात.याचबरोबर रूपाली ताईंना मेंहदी,पेंटींग,विणकाम,जुनी गाणी ऐकण्याचा छंद सुद्धा आहे.त्यांचे पती श्री सुंदरराज वैद्य हे नांदेड येथील महावितरण कंपनीमध्ये सीनियर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत, त्यांचासुद्धा रूपाली ताईंच्या कार्यास पाठिंबा असल्याचे त्या सांगतात. स्वरुप हा मुलगा व स्वराली ही मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत.
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना रूपालीताई आपले आदर्श मानतात.आपल्या दोन्ही मुलांनी आर्मी जाॅईन करुन,देशसेवा करावी अशी इच्छा रूपालीताई प्रामाणिकपणे व्यक्त करतात.सामाजिक ,सांस्कृतिक, साहित्यिक व पत्रकारिता या क्षेत्रामध्ये धडाडीने कार्य करणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार व साहित्यिक रूपालीताई आशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला पुढिल साहित्यीक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…!!
अजय अंबादासपंत देशपांडे.
वरुड जि. अमरावती.
9527673067