नांदेड ; प्रतिनिधी
आज देशामध्ये अनेक प्रकारे छुपे हल्ले होत आहेत त्या हल्यापैकीच एक लवजिहाद आपल्या शहरापर्यंत, आपल्या घरापर्यंत आला आहे याचे गांभीर्य ओळखून समाजामध्ये प्रत्येकाला याची जाणीव व्हावी समाज जागृतीचे काम व्हावे म्हणून मारुती पाटील वाघ यांनी स्वखर्चातून द केरळा चित्रपटाच्या आयोजनाचा धडाका लावून दिला आहे. त्यामुळे त्यांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
दि. ८ जून रोजी पीव्हीआर चित्रपट ग्रह येथे द केरळा स्टोरी चित्रपटाचे मोफत आयोजन केले होते. या चित्रपटाचे उद्घाटन नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी असे सांगितले की, हा समाज उपयोगी चित्रपट असून प्रेक्षकांना त्यांचे गांभीर्य ओळखून आपली जबाबदारी निभावण्याचे आवाहन केले. तसेच हा उपक्रम राबवल्याबद्दल मारुती पाटील वाघ यांची पाठ थोपटली. याप्रसंगी महानगरचे जिल्हाध्यक्ष प्रवीणभाऊ साले, भाजपाचे नेते संतुकराव हंबर्डे,प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, बाळू खोमणे, अभिषेक सौदे,भाजप महानगरचे कोषाध्यक्ष बालाजी गिरगावकर, महानगरपाध्यक्ष शितल खांडील, युवा मोर्चा सरचिटणीस सुनील भालेराव संदीप पावडे, अक्षय अमिलकंठवार, रुपेश व्यास, नवा मोंढा मंडळाचे सरचिटणीस कामाजी सरोदे, सरचिटणीस राम मस्के, गौरव पाटील, तिरुपती भग्नुरे, सुखबीरसिंह फौजी, रमेश कंचलु, नंदू कोंपलवार, केदार सह खोब्रागडे नगर येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात हजर होते.