आत्म्याचे पंचकर्म  ..

कालच्या लेखात मी शरीराचे पंचकर्म यावर लिहीलं होतं.. पण शरीराइतकच किवा त्याहीपेक्षा महत्व आहे ते आत्म्याला.. आत्मा या कंसेप्टवर काही लोकांचा विश्वास नसतो.. पुनर्जन्म यावर पण बरेचदा उलटसुलट चर्चा वाचायला मिळतात..
पण ज्याने भगवद्गीता वाचली आहे तो यावर विश्वास ठेवेल.. खुद्द भगवंतानेच यावर इतकं सांगितलय मग मी काय वेगळं लिहीणार.. वेगळं काहीच लिहीणार नाही फक्त पंचकर्माचा आधार घेत त्याला पुष्टी देणार आहे..

मुळात जो अमर आहे तो आत्मा.. त्याला कशाचाच फरक पडत नाही.. ना मारु शकत , ना कापु शकत मग आपण शरीरावर करत असलेल्या अत्याचाराचा किवा आपल्यातील वाईट विचारांचा आपल्या आत्म्यावर परिणाम होतो त्यालाच आपण कर्म म्हणतो ना.. मग कर्म चांगली केली म्हणजेच आपण त्याचे पंचकर्म ( चांगले वागणे ,चांगले बोलणे ) केले तर तोही शुध्द राहील कारण आपण कमावलेले नाव प्रॉपर्टी सगळं इथेच रहाणार आहे कारण ते भौतिक शरीरासाठी केले गेले आहे आणि आत्म्यासाठी केलेले कर्म ( पंचकर्म ) हे पुढच्या जन्मात सोबत रहाणार आहे.. त्यामुळे शरीराची काळजी घेताना आत्म्याचा विचार करुयात..

 

झी मराठीवर भगरे गुरुजी यावर खुप छान बोलतात.. जरुर ऐका.. चोरी करणं,लबाडी करणं , दुसऱ्याला त्रास देणं, उधारीची परतफेड न करणं, निंदा नालस्ती करणं यासारख्या गोष्टीनी आत्मा विशुद्ध होतो .. एकतर हे करुच नये आणि चुकून घडलेतर यावर पंचकर्म म्हणजेच हरीनाम हाच एकमेव उपाय आहे.. संत तुकाराम महाराज सांगतात.

नामसंकीर्तन साधन पै सोपे
जळतील पापे जन्मांतरीची
म्हणजेच काय हरीनामात इतकी ताकद आहे की फकत आताचीच पापे नष्ट नाही तर अनेक जन्मांची पापे नष्ट होतात.. हरीनाम आणि पुण्यकर्म करुन आपल्या आत्म्याने कुठल्याही योनीत जन्म घेतला तरीही तो आनंदीच राहील.. आपण पहातो एखादं भुभु मर्सिडीजमधुन फिरते..त्याची कर्मे हेच त्याचं उत्तर आहे..आणि एखादं बिना पाण्याशिवाय असतं.. माणसाच्या बाबतीतही तेच .. आपण फक्त स्वतःसाठी हरीनम घेउन स्वतःला पुढच्या उत्तम जन्मासाठी तयार करायचे आहे.

 

मोक्ष मिळणं इतकं सोपे नाही त्यासाठी सुध्दा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा .मोक्ष .म्हणजेच जन्म मृत्यू तुन सुटका ..त्यामुळेच भगवंतापर्यंत पोचण्यासाठी हरीनाम रुपी पंचकर्म करुयात..
मला जितकं जमलं तितकं सोप्पं करुन सांगायचा प्रयत्न केला आहे..हरीनाम हेच आत्म्याचे पंचकर्म ..तुम्ही सुरुवात करा आणि रिझल्ट पहा.. विचारांची दिशा बदलण्याची ताकद यात आहे..
हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे

सोनल गोडबोले..

 

पंचकर्म.. Body cleaning ,oiling and sevicing.. http://yugsakshilive.in/?p=24809

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *