पंचकर्म.. Body cleaning ,oiling and sevicing..

Body cleaning ,oiling and sevicing..
आपण घराची स्वच्छता करतो .. गाडीचं सर्विसिंग करतो.. त्याच्या इंजीनाची काळजी घेतो कारण आपण ते विकत घेतलेलं असतं…बॅंकेत पैसे साठवतो .. एफ्डी करतो कारण आपल्या म्हातारपणाची सोय किवा मुलांची सोय ..
हे करत असताना जे शरीर फुकट मिळालय त्याचं काय ?? .. त्याचं सर्व्हीसींग नको का करायला..प्राचीन काळापासून उपलब्ध असलेलं आयुर्वेद आणि त्यातील पंचकर्म हा एक भाग.. गेली १३ वर्षे जुलै महिन्यात मी बस्ती करते.. त्यावर दरवर्षी लिहीते.. पण यावेळी मी पहिल्यांदाच पन्चकर्मातील विरेचन करत आहे.. सुरु करण्याआधी ऐकलं होतं की ते हेक्टीक असतं पण मला कायमच नवीन चॅलेंजेस स्वीकारायला आवडतात.. मीनी विरेचन फक्त चार दिवस करतेय.. त्यामधे डॉक्टर सजेस्ट करतात रोज सकाळी काहीही न खाता गाईचे तुप प्यायचे मग संध्याकाळी फुल बॉडी मसाज आणि वाफ असते.. तुप प्यायल्यानंतर काही वेळाने पोटात जे काही ढवळायला लागते..रोज तुपाची मात्रा वाढत जाते त्यामुळे सगळं प्रकरण अवघड होतं.. थोडं अस्व्सथ वाटतं पण तुप पचल्यावर जेव्हा पोटातील घाण बाहेर पडुन त्यासोबत दोष बाहेर पडतात त्यावेळी मिळणारं समाधान नक्कीच लय भारी असतं.. विरेचन साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी मधे करतात..

जवळच्या पंचकर्म स्पेशालिस्टकडुन माहीती घेउन शरीराचे क्लींसींग जरुर करुन घ्या.. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार डॉक्टर सजेस्ट करतात..
आपण आधी आपल्या मनावर आणि शरीरावर प्रेम करायचं आणि नंतर इतरांवर..बस्ती केल्यावर त्यावर डीटेल लिहीनच..उद्या आपण आत्म्याच्या सर्व्हीसींग बद्दल बोलणार आहोत.. आत्मा हा शरीराइतकाच महत्वाचा आहे .. त्याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी..
पावसाळा सुरु झाल्यावर भजी खाताना घरी करुन खा आणि प्रमाणात खा.. बाहेरच्या अनेकदा उकळलेल्या तेलातील कुठलाही पदार्थ हानीकारकच असतो… पंचकर्माने चार दिवसात माझं दिढ किलो वजन कमी झालं.. आणि महत्वाचं म्हणजे हे ॲंटीएजींग आहे. ज्यांना दिवस रहात नाहीत अशाना सुध्दा डॉक्टर शुध्दी करुन घ्यायला सांगतात..
अनेक वर्षे करत असल्याने मिळणारे रिसल्ट तुमच्याशी शेअर केले आहेत. मस्त निरोगी आणि आनंदी रहा..
सोबत व्यायाम करुन फिट रहा..
Be fit.. Be evergreen..

 

सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *