महा आयटीच्या सेवांमध्ये” फिफो ” प्रणाली लागू …! शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत काढुन घ्या – डॉ मंडलिक

 

कंधार ;(मो.सिकंदर)

नुकतेच बारावी व दहावीचे निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक, उत्पन्न ,रहिवासी, जात, शेतीविषयक असे आवश्यक सर्व दाखले काढण्यासाठी सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे.पण शासनाने दि २९ मे पासून अर्जदाराचे अर्ज तात्काळ निकाली काढण्यासाठी नव्याने अमलात आणलेल्या फस्ट इन फस्ट आउट (फिफो) या प्रणाली मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोईस्कर झाले आहे.

 

पहिले अर्ज पहिले निवारण या कार्यप्रणालीत फक्त वैद्यकीय दाखले मूळ वापरून वैद्यकीय कारणास्तव तात्काळ महसूल विभागाकडून दाखले मिळण्याची सुविधा आहे इतर कोणालाही कोणताही प्रकारचा दाखला तात्काळ मिळणे नाही तो शासनाने नमूद केलेल्या विहित कालावधीतच मिळेल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक यांनी केले आहे.

 

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष सध्या सुरू असून, विविध उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी यासारखे उपक्रम सरकार मार्फत राबविण्यात येत आहेत. अशातच आता महाआयटीच्या सर्व सेवांमध्ये ” फिफो ” हे नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीच्या माध्यमातून महा आयटी अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या सर्व सेवांमध्ये अर्ज करणाऱ्याच्या अर्ज निकाली काढूनच पुढील अर्ज निकाली काढावा लागणार आहे. ही एक इन्व्हेंटरी पद्धत आहे, जी आतापर्यंत उद्योग व्यापार क्षेत्रात वापरल्या जायची मात्र आता ती माहिती अंतर्गत सर्व सेवांमध्ये वापरण्यात येणार आहे. पहिला आलेला अर्ज हाच पहिला अर्ज असल्याचे गृहीत धरून यानंतर पुढील अर्ज निकाली काढण्यात येणार असून त्यामुळे विविध कागदपत्रांसाठी सेतू केंद्रावर अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळणार ही नवीन प्रनाली शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या अर्जदारांच्या हिताची ठरणार आहे.

 

महा आयटी अंतर्गत तालुक्यातील सर्व सेतू केंद्रावर ही सिस्टीम दि.२९ मे पासून लागू झाली आहे या ठिकाणी काढण्यात येणारे सर्व कागदपत्रे प्राधान्याने या सिस्टमनुसार काढण्यात येतील यामुळे प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लागणारे दाखले वेळेच्या आत काढून घ्यावे असे आवाहन डॉ शरद मंडलिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *