वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांचा ठिकठिकाणी सेवानिवृत्ती समारंभ ; कंधार सह नियोजन भवन व हॉटेल सेन्ट्रल पार्क ,नांदेड येथे संपन्न

 

 

नांदेड ; प्रतिनिधी

कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त दि ३१ मे २०३२३ रोजी झाले. त्याअनुषंगाने जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर साहेब यांनी नियोजन भवन नांदेड येथे दि ०५ मे २०२३ रोजी सेवपूर्ती व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय डॉ.सुर्यकांत लोणीकर होते. हा कार्यक्रम ठिक 11:०० वा वैद्यकीय क्षेत्रातील धन्वंतरी प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

 

त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सह,जिल्हा शल्यचिकित्सक आदरणीय डॉ.निळकंठ भोसीकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच डॉ.झिणे मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड,यांची ही उपस्थिती होती .
तसेच सायंकाळी ठीक ०7:०० वा सेवापूर्ती गौरव तथा सुर्यसाक्षी विशेषांक प्रकाशन सोहळा हॉटेल सेन्ट्रल पार्क स्टेडियम रोड,नांदेड येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नांदेड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मा.पि. एस.बोरगावकर साहेब ,विशेष अतिथी डॉ.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रमुख आबेडकरवादी मिशन नांदेड डॉ.दिपक कदम तसेच विशेष अतिथी आंबेडकरी चळवळीचे विचारवंत सुरेशदादा गायकवाड,जिल्हा परिषदेचे श्री पुजरवाढ साहेब यांची उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमाचे आयोजक मा.जयपाल वाघमारे (पत्रकार), मा. नागोराव डोंगरे (साहित्यिक),समीक्षक मा.प्रज्ञाधर ढवळे आपले विनीत सप्तरंगी साहित्य मंडळ व रामराव गुरुजी लोणीकर संस्थे तर्फे होते,

नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिंदे यांनी केले व यांनी केले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ भोसीकर यांनी डॉ लोणीकर यांचा सहपत्नीक सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला व त्यांच्या कामाचा यथोचित गौरव केला.
सर म्हणाले
कंधार रुग्णालया चा विकास अगदी समाधानकारक केला व जनतेचा रुग्णालय कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.जिल्ह्यात उत्कृष्ट रुग्णालय म्हणून डॉ लोणीकर नी ओळख करून दिली, राष्ट्रीय कार्यक्रम व स्वच्छता, COVID-19 चे काम यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यांची उणीव नक्कीच भासणार आहे. डॉ. लोणीकर यांच्या योग्य व्यवस्थापन व मार्गदर्शनामुळे दोन वर्ष 2 लाख रुपये चा रुग्णालयास कायाकल्प पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे..

दुसरा सोहोळा
सप्तरंगी साहित्य परिषद महाराष्ट्र तर्फे आयोजित करण्यात आला. सेंट्रल पार्क नांदेड येथे साजरा झाला. 30 वर्ष सेवा पूर्ती लक्षात घेऊन सदरील सोहोळ्यात मान्यवर यांनी मते मांडली..शैक्षणिक प्रवास, गरिबी वर केलेली मात, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या सेवा व त्यांचा केलेला गौरव याबद्दल मा.दीपक कदम सर यांनी अनुभव सांगितले..
सुरेशदादा गायकवाड यांनी डॉ लोणीकर यांनी शासकीय सेवा देत, सामाजिक कार्य कसे केले, इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या कश्या पार पाडल्या याबाबत कौतुकास्पद वर्णन केले. आदरणीय जिल्हा अधिकारी बोरगावकर साहेब यांनी कंधार मध्ये COVID-19 व प्रशासकीय कामात उल्लेखनीय कामगिरी कशी बजावली याचे उदाहरण म्हणून डॉ लोणीकर यांच्या उल्लेख केला. सप्तरंगी परिषदेचे पदाधिकारी डोंगरे सर, व ढवळे सर यांनी मी केलेल्या सेवेचा पाढा वाचला, वादग्रस्त कसे झाले व पुरस्कार कसे मिळविले ,कुठे त्रास झाला, या बाबतीत सर्व मूल्यांकन केले त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी मुळेच कळमनुरी व कंधार ही रुग्णालये जिल्ह्यात “नामांकित रुग्णालय” म्हणुन ओळखले जात आहेत. मध्यंतरीच त्यांच्या एकंदरीत मागील उल्लेखनीय सेवेचा आढावा घेऊन त्यांना महात्मा कबीर समता परिषदेतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच राज्य स्तरावरील महाराष्ट्र शासन डॉ आनंदीबाई जोशी हा मानाचा पुरस्कार सलग दोन वेळा पटकाविले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी व कोविड योद्धा म्हणून एका संस्थेतर्फे प्रेरणात्मक पुरस्कारही त्यांना देण्यात आला.सर्व मान्यवरांनी डॉ लोणीकर यांच्या जिवन पट आधारित 22 लेखकाने लिहलेला लेख..”सूर्य साक्षी “या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..
व पत्नी डॉ रंजना यांच्या सह उपस्थित प्रमुख मान्यवर व सप्तरंगी साहित्य परिषद तर्फे भव्य दिव्य दिमाखात सत्कार करण्यात आला…

 

यावेळी परभणी, हिंगोली, उदगिर,भोकर, वसमत, कोल्हापूर, पुणे, येथून त्यांचे शुभ चिंतक, मित्र परिवार, नातेवाईक, या नेत्र दीपक सोहोळ्याला हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *