इनबॉक्सतल्या गमतीजमती – पुरुषहृदय भाग २७

माझ्यासाठी हे पुरुष हृदय अजिबात कठीण नाही..माझ्यासारख्या धनु राशीची स्त्री.. ज्या राशीचे चिन्ह आहे अर्धा पुरुष आणि अर्धा घोडा म्हणजेच काय तर पुरुषांशी जास्त कनेक्ट होणारी मी सहज त्यांच्या हृदयात प्रवेश करते आणि रुतलेल्या , दबलेल्या , साठवलेल्या स्त्री बद्दलच्या भावना इनबॉक्समधे उत्तर न देता लेखात देते..
हेल्दी फ्लर्टींग जरुर करावे पण माझा डीक किती मोठा आहे पहा मॅम असं म्हणुन तुमच्या डिकचा फोटो पाठवणे म्हणजे स्वतः एक लेव्हल खाली उतरण्यासारखे आहे.. तेव्हा मित्रा प्रेमाचा सल्ला देते याचा मला काडीचाही उपयोग नाही आणि इंटरेस्ट तर त्याहूनही नाही.. मी त्याच्याकडे सौंदर्य म्हणुन किवा अभ्यासाचा भाग म्हणुन पहाणार आणि तु माझ्याकडे वासना म्हणुन.. यापेक्षा लैगिक शिक्षण घेउन प्रगल्भ व्हा..

 

मॅम तुमचा नंबर द्या .. कशाला विचारलं तर म्हणतो कसा ,,मी सेक्सवर लिहीतोय त्यामुळे तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीला भेटायचय.. मी काय रिकामटेकडी आहे का ?? तुम्ही उत्तम लिहा आणि शेअर करा मी नक्कीच अप्रीसिएट करेन..
मी भेटण्याचा आणि ह्यांच्या लिखाणाचा काय संबंध ??.
सोनल मॅम , तुमची मुलाखत घ्यायचेय त्यासाठी आधी पुस्तक वाचावे लागेल पाठवुन द्याकी .. अरे मित्रा , तुला फुकट पुस्तक हवय असं स्पष्ट सांग की…आपण एखाद्याशी बोलताना आपली ओळख करुन देण्याचे सुध्दा मॅनर्स नाहीत..
डायरेक्ट फोन किवा मेसेजेस .. हद्द झाली राव..
माझा इनबॉक्स म्हणजे पुरुषांची फिलॉसॉफी आहे..किव येणं या शब्दाचा अर्थ मला तिथे उमगतो…तुमच्यावर रागवता येत नाही मित्रांनो पण पुरूष हृदय लिहीता येतं बरं का..
मी म्हणेन फ्लर्टींग करा पण त्याचा दर्जा उच्च ठेवा ना..
अगदी काल वाचलेला मेसेज म्हणजे , सोनल मॅम सचिन सरांच्या जागी मी असायला हवा होतो म्हणजे तुम्हाला ना सेक्स्वर लिहूच दिलं नसतं.. अरे भावा म्हणुन तोच माझा नवरा आहे ना , दुसऱ्या कोणाला मी आयुष्यात उभं तरी करेन का ??.. नको ती स्वप्नं पहाण्यापेक्षा सचिन सरांसारखा उत्तम माणूस बन..
आताच एक मेसेज वाचला , मॅम तुमच्यावर प्रेम झाले हो ,,कधी झाले कळलेच नाही.. हवा तर स्क्रीनशॉट शेअर करा पण जे आहे ते वोललो.. यावर मी एक स्माइली पाठवली.. तु प्रेम करत रहा बाबा.. माझ्याकडून अपेक्षा करु नकोस..यापेक्षा जास्त मी काय बोलु शकते..
इनबॉक्सतल्या गमतीजमती वाचा आणि सोडुन द्या पण फ्लर्टींग करायचं मात्र सोडु नका.. २८ वा भाग लिहायचाय की. जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पुरुषांच्या हृदयात उतरायलाच हवं.. मैत्रीणीनो पुरुषांचा राग राग करण्यापेक्षा आनंद घ्या .. नाहीतरी आपल्याला सुंदर कोण म्हणणार ना
लागा नव्याने कामाला..

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *