कंधार ; प्रतिनिधी
ऐतिहासिक कंधार म्हटले आठवते शैक्षणिक कार्य, सत्याग्रहातून निर्माण चळवळीचा बालेकिल्ला. सहा टर्म कंधार विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र विधानसभेत खंबीर नेतृत्व करुन आपली कारकिर्द गाजवली.
एक वेळस खासदारकीचे प्रतिनिधित्व करतांना देशपातळीवर गाजवली.छ.शिवाजी महाराज यांच्या नावाने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या मोफत शैक्षणिक संस्थेची निर्मिती करुन या मन्याड खोर्यातील सुग्या-मुग्यांच्या लेकरा-बाळांना दुरडीतली भाकरी खाऊन आपापल्या गावात शैक्षणिक लंगर सुरु करून तालूक्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकला.यंदाचा शिवराज्याभिषेक दिन दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या पश्चात ३५० वा दिन आला.ऐतिहासिक कंधार शहराचे ह्रदय असलेल्या छ.शिवरायांच्या चौकात ९ मे १९५९ रोजी पूर्वीच्या अर्ध पुतळ्याचे शिल्पकार, मन्याड थडीचे कलामहर्षि माजी आमदार भाई गुरुनाथरावराव कुरुडे यांना दिवंगत डाॅ.भाई मुक्ताईसुतांनी सुचित केल्यानंतर त्यांच्या समर्थ हस्ते पुतळा निर्माण झाल्यानंतर गनीमी कावा वापरुन दिवंगत डाॅ.भाई केशवराव धोंडगे व त्यांच्या सहकार्याने ६४ वर्षापूर्वी छ.शिवप्रभुंचा अर्थ पुतळा जनता-जनार्धन मायबापांच्या साक्षीने बसविला.त्या छत्रपतींच्या पुतळ्याचा पंचामृताने दुग्धाभिषेक श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमराव धोंडगे यांच्या समर्थ हस्ते करुन महाराष्ट्रात नव्हे तर देशात अनोखा ३५० भगव्या ध्वजांचा ध्वजहार छ.शिवरायांना अर्पण करुन अभिवादन केले.माजी आमदार व संस्था सचिव हे ९२ वर्षाचे चीरतरुण आहेत.त्यांना दुग्धाभिषेक करणे शक्य नसल्याने त्यांच्या वतीने प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब यांनी केले.हा दैदिप्यमान राजेशाही थाटामाटाचा सोहळा,सर्व शाखेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर बंधु-भगीनींच्या साक्षीने पार पडला.संस्थेच्या रितीरिवाजानुसार प्रथम वंदेमातरम राष्ट्रीय गीत झाले.त्यानंतर दिवंगत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांना आणि ज्ञात-अज्ञात हुतात्यांना आदरांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी संस्थेचे सदस्य प्रा.शंकरराव आंबटवाड, संस्था अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब आणि संस्था सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांनी इतिहास सांगत मनोगत व्यक्त केले.अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ साहेब यांनी आज पासून शतक महोत्सवाचा कार्यक्रम आज म्हणजे शिवराज्याभिषेक दिना पासून सुरुवात झाल्याची घोषणा केली.हा आजचा पहिला कार्यक्रम सुरु झाला.
अगळा-वेगळा ३५० भगव्या ध्वाजाचा ध्वजहार करणारे सुलेखनकार दत्तात्रय एमेकर यांच्या कल्पनेतून तयार झालेल्या ध्वजहाराचे कौतुक करुन अशा कल्पक संकल्पना राबविण्यात अग्रेसर राहण्यास सदिच्छा देत शाबासकी दिली.या कार्यक्रमा नंतर कंधार शहरातील महापुरुषांच्या स्मारक पुतळ्यांना माल्यार्पण करुन संविधानकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहेब, मेवाडचे राजा महाराणा प्रतापसिंह,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहेब मानाचा मुजरा करत अभिवादन केले.
या दैदिप्यमान कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर सर,संस्था सदस्य प्रा.वैजनाथराव कुरुडे सर,माजी उपसरपंच भाई पंडितराव पेठकर व भाई गुरुनाथराव पेठकर, माधवराव भालेराव,गोपीचंद जाधव,शाहुजी आहेर,पुरुषोत्तम भाऊ समर्थक मारोती डोईजड, लाईफचे पत्रकार निलेश गायकवाड,लाडेकर सहित अनेक कंधार शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.