फुलवळ येथे बस निवाऱ्या अभावी प्रवाशांचे हाल ; प्रवाशी उन्हाच्या तिव्रतेला घाबरून जागा मिळेल तेथे सावलीचा आसरा घेत आहेत.

फुलवळ (धोंडीबा बोरगावे)

कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्गवर कंधार-मुखेड आणि कंधार-उदगीर या तालुक्यांना जोडणाऱ्या महत्वाच्या ठिकाणी आले असून येथून वाहनांची व प्रवाश्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच दररोज शाळेला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे , परंतु प्रवाश्यांसाठी मात्र बस निवारा नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून उन्हाच्या तीव्रतेने व्याकुळ झालेल्या प्रवाशांना जागा मिळेल तिथे आसरा करावा लागत आहे. येथे प्रवाशी निवारा नसल्याची खंत अनेक दिवसांपासून जाणवत असून प्रसार माध्यमातून ने नेहमीच त्यासाठी पाठपुरावा केला आहे , आता वाढत्या प्रवाशी संख्येचा विचार करता येथे बस निवाऱ्याची नितांत गरज असून या बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून प्रवाशी निवारा उभारावा अशी प्रवाशी व गावातील नागरिकांतून मागणी होत आहे.

येथील वास्तविकता मात्र काही वेगळीच आहे कारण आज घडीला फुलवळ हे कंधार तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या व मतदार संख्या असलेले जिल्हा परिषद गटाचे गाव आहे. तरीपण या गावाचा म्हणावा तसा विकास अद्यापही झालाच नाही. एम आय डी सी तर आहे . परंतु तेथे कोणते मोठे उद्योग नाहीत , त्यामुळे तरुण बेरोजगारांना काम नाहीत . एवढे मोठे गाव असून प्राथमिक आरोग्य केंद्र नाही , येथे बी एस एन एल चे कार्यालय आहे परंतु सुविधा नाहीत. गाव मुख्य रस्त्यावर आले परंतु बाजारपेठ नाही. अशा अनेक कमतरता आहेत.

येथे प्रवाश्याना ना बसण्याची व्यवस्था आहे ना सार्वजनिक शौचालय-मुतारी . त्यामुळे प्रवाश्यांची चांगलीच हेळसांड होत. शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना तासंतास तासनतास ताटकळत रस्त्याच्या बाजूला उभे राहावे लागते तर प्रवाशांना कोणत्याही मालकी दुकान समोर सावलीचा आसरा घ्यावा लागतो आहे. तेंव्हा येथे बसनिवाऱ्याची नितांत गरज असून संबंधितांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष घालून येथे बसनिवारा उभारावा तसेच अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावीत व ज्या-ज्या अभावाने गावाचा विकास खुंटला आहे त्या-त्या कामाला चालना देत गावविकासाला चालना द्यावी अशी मागणी होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *