फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा ता. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला , याच दिवसाचे औचित्य म्हणून २०२१ साली काढलेल्या परिपत्रकानुसार ता. ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून सर्वत्र साजरा करावा असा महाराष्ट्र राज्य सरकारने अध्यादेश काढला , त्याचेच पालन करत आज फुलवळ ग्राम पंचायत कार्यालय येथे शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हा ३५० वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक असून सर्वत्र या सोहळ्यानिमित्त शिवस्वराज्य दिन साजरा होत असतांनाच आज फुलवळ येथेही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः कलश पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच विमलबाई मंगनाळे सह उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
यावेळी सरपंच विमलबाई मंगनाळे , माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे , शांताबाई जेलेवाड , नागनाथ मंगनाळे , डॉ. दिनेश रामपुरे , कैलास मंगनाळे , बाळू जेलेवाड , मनोहर जाधव , शिवहार कऱ्हाळे , विठ्ठल मंगनाळे , पत्रकार धोंडीबा बोरगावे , मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते , परमेश्वर डांगे , यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.