मौ. मानसपुरी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण

 


कंधार  ( हानमंत मुसळे  )

 
तालुक्यातील मौ. मानसपुरी अंतर्गत लालवाडी तांडा येथे शासनाची गायरान जमिन सर्वे नं. 54/a मध्ये 42 हेक्टर व तायाबाई आमु राठोड सर्वे नं.54/v मधील 2 हेक्टर यांच्या नावावर असुन लालवाडी तांडा येथील काही लोकांनी जबरदस्ती अतिक्रमण करुन कब्जा करत आहेत. असे निवेदन तायाबाई आमु राठोड वय 75 वर्षे यांनी मा. तहसिलदार कंधार, यांना दिले आहे. व या निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड, मा. पोलीस अधिक्षक साहेब नांदेड, मा. उपविभागीय अधिकारी साहेब कंधार, मा. पोलीस निरीक्षक कंधार यांना देण्यात आल्या आहेत.

या निवेदनात असे म्हटले आहे की, तायाबाई आमु राठोड सर्वे नं. 54/v मध्ये 2 हेक्टर यांच्या नावे व सर्वे नं. 54/a मध्ये 42 हेक्टर शासनाची गायरान जमिन आहे या जमिनीवर लालवाडी तांडयातील काही गुंन्ड प्रवृत्तीचे लोक जाणुन-बुजून जनावरांसाठी गोठा व कडबा ठेवण्यासाठी आणि त्या गायरान जमिनीवर वाहीती करुन अतिक्रमण करुन पिके घेत आहेत व माझ्या मालकी व ताब्यातील जमिनीवर पण अश्या बेकायदेशीर पणे कब्जा करीत आहेत आणि बेकायदेशीर मंडळी जमवुन आम्हाला हया तुमच्या 2 हेक्टर मध्ये प्लाँटीग पाडुन व जमिन वाहीती करण्यासाठी हिस्सा दया असे म्हणून मनमानी व दंडेलशाही व हुकूमशाही त्याची सर्रास पणे चालु आहे. शासनाच्या गायरान जमिनीवर असे अतिक्रमण होत राहिले तर गायरान जमिन शिल्लक राहणार नाही. भविष्यात शासकिय योजनेसाठी सुध्दा गायरान जमिन राहणार चौकशी करुन सदरिल अतिक्रमण करणाऱ्या गुंन्ड प्रवृत्तीच्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही करावी व मला न्याय दयावा असे निवेदनात म्हटले आहे व या निवेदनावर तायाबाई आमु राठोड याची स्वाक्षरी आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *