स्मशानभूमीची देखरेख करणाऱ्या कामगार कुटुंबांस नवयुवक भीमजयंती मंडळाची मदत

 

नांदेड – नवीन कौठा परिसरातील कुशीनगरच्या नवयुवक भीमजयंती मंडळाचा वतीने जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, राज्य कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे,थोरात बंधू, राहुल जोंधळे, कंधार तालुकाध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ढवळे आणि भैय्यासाहेब दुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्मशानभूमीची देखरेख करणाऱ्या कामगार कुटुंबांस धान्य, कपडे वाटप करण्यात आले.

नवीन कौठा परिसरातील कुशीनगरच्या नवयुवक भीमजयंती मंडळाचा वतीने सिडको येथील स्मशानभूमीत गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबातील मारोती पवार, बालाजी पवार, रुक्मिणीबाई पवार, पुष्पाबाई पवार, शारदा पवार, अक्षय पवार, ओमकार पवार, निकिता पवार, अक्षरा पवार हे सदस्य तिथेच राहून स्मशानभूमीची देखरेख तथा जनसेवा करतात. या कुटुंबास आपण काही मदत करावी या उद्देशाने नवयुवक भीमजयंती मंडळाच्या राहुल हैबते, सचिन कांबळे, सिद्धार्थ कांबळे, उत्तम सोनकांबळे, सोनबा गोल्हेर, जळबा सोनकांबळे या कार्यकर्त्यांनी तांदूळ, गहू, सर्व कुटुबांस नवीन कपडे आदी जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले. तसेच प्रशासनाकडे पवार कुटुंबियांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे जयंती मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *