कंधार,(वार्ताहर ) सेवादल काँग्रेसच्या कंधार तालुका अध्यक्ष पदी रमेशसिंह ठाकूर यांची दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे. निवडीचे नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच ठाकूर यांना प्रदान करण्यात आले आहे.
रमेशसिंह ठाकूर यांचे सेवादल काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचे काम, पक्ष बांधणी व पक्षनिष्ठा पाहून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निर्देशानुसार तसेच सेवादल काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष विलास औताडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या मान्यते नुसार सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी यांनी रमेशसिंह ठाकूर यांची सेवादल काँग्रेसच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी फेर निवड केली आहे.
सोमवार दि.12 जून रोजी नांदेड येथील जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ठाकूर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,सेवादल काँग्रेस जिल्हध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, संजय लहानकर, लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार आदींची उपस्थिती होती.