कृषी फाउंडेशन च्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सदा वडजे यांची निवड…

 

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

शेती, शेतमाल, शेतकरी, निसर्ग विषयक चळवळ महाराष्ट्रभर राबवणाऱ्या कृषी फाउंडेशन च्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी चळवळीतील कार्यकर्ते, निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व असलेले कंधार तालुक्यातील आंबूलगा येथील सदा वडजे यांची निवड करण्यात आलेली आहे.

मागील अनेक वर्षापासून झेंडूचीफुले अभियान शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून महाराष्ट्रभर राबवल्या जाते. स्वयंप्रेरणेने अनेक मान्यवर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला एकत्र येऊन शेतमालाचा सन्मान करतात. या अभियानाचे स्वरूप आता विस्तारत चालले आहे.

प्रत्येकच शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून राबवल्या जात आहे. शेतमाल शेतकऱ्याकडूनच खरेदी करावा. योग्य किमतीला खरेदी करावा. कमी भाव असेल तर जास्त भावाने खरेदी करावा अशी तत्त्व प्रणाली ग्राहकांच्या अंगी राबवण्यात हे अभियान यशस्वी होताना दिसते आहे. म्हणून संघटित स्वरूपात शेतकऱ्यांच्या शिकलेल्या, नोकरदार, व्यापारी, उद्योगपती, समाजकारणी, राजकारणी मुलांनी व मुलींनी एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा होती. यासाठी कृषी फाऊंडेशनची निर्मिती करण्यात आली.

या कृषी फाउंडेशनच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सदानंद विठ्ठलराव वडजे यांची निवड करण्यात आलेली आहे.
जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देत असताना आमचे मार्गदर्शक कवी शिवाजी आंबुलगेकर आणि अन्ना जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *