कन्या रास आणि आत्मविश्वास..

 

कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात.. निरीक्षण करताना त्या व्यक्तीतील बारकावे जाणवतात.. राशीनुसार स्वभाव असतात पण ते आपण बदलुही शकतो .. त्यासाठी हवी निरीक्षण शक्ती ती या लोकांमधे कमी प्रमाणात आढळते.. अतिशय हुशार , मनाने खूपच चांगले आणि खुप जास्त मदतीला तत्पर अशी ही रास असल्याने लोक त्यांचा वापर करुन घेतात.. बोलण्यात आणि राहणीमानात अगळपगळ अशी ही कन्या रास.. अनेक कोटी लोक बारा राशीत विभागले गेले म्हणजे प्रत्येक कन्या रास वाला सारखा नसतो पण हे त्याचे ठोकठाळे..
काल एका कार्यक्रमात एका ३५ शीतील तरुणाशी ओळख झाली.. त्याचा वावर आणि आत्मविश्वास नाही यावरुन मला त्याचा अंदाज आला होता.. पण न राहवुन मी त्याला रास विचारलीच.. लेक्चरर शिप करत असुन मुलींची भिती वाटते म्हणुन त्याने लग्न केलं नाही.. त्याला एकही मैत्रीण नाही.. सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तर येतात पण उत्तर देताना हात थरथरतात , तोंडातुन शब्द फुटत नाही.. दिसायलाही चांगला असुन त्या व्यक्तीकडे आत्मविश्वास नसेल तर त्या व्यक्तीची प्रगती होवु शकत नाही.. हेच मला त्या च्या बाबतीत जाणवलं.. मॅम यासाठी काय करु सांगा ना असं त्याने मला विचारलं, त्यावर काय उत्तर देउ हा मला प्रश्न पडला कारण आत्मविश्वास हा स्वतः त्या व्यक्तीने डेव्लप करायचा असतो. आपल्यात बदल घडवणं हे आपल्याच हातात असतं.. कदाचित त्याला सतत पाठिंबा देत रहाणारी मुलगी मिळाली आणि तो पुढे गेला तर त्याची प्रगती होवु शकते… या व्यक्तीनी स्वतःचं स्टेट्स जपून आपला मानसन्मान वाढवुन मग दुसऱ्यासाठी काम करावं नाहीतर लोक वापरून फेकुन देतात… नको तिथे बोलणं , अति खरं बोलणं आणि अति बोलणं याने तोटे होतात.. काल त्या मुलाकडे पाहुन थोडं दुख झालं .. स्वभावाला औषध आहे.. निरीक्षण शक्ती कमी असली की काय असु शकतं हे याचं उत्तम उदाहरण आहे..
शरद उपाध्ये सर ( राशीचक्र ) हे कन्या राशीवर भरभरुन बोलतात.. त्यांचं कुलुपाचं उदाहरण असेल किवा विमानातील उदाहरण असेल इतकं या लोकांच्या बाबतीत परफेक्ट असतं..

सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *