साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी कुलगुरू डॉ.उद्धवजी भोसले यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी कुलगुरू डॉ.उद्धवजी भोसले यांच्याशी  शिष्टमंडळाची चर्चा  


नांदेड ;


         साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड मध्ये अध्यासन व अभ्यास केंद्र स्थापन करण्यासाठी माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकतेच खासदार निधीतून २५ लाख रुपये दिले असल्याचे पत्र आज दि.०१ सप्टेंबर रोजी मा. कुलगुरूंना दिले. 

    त्यासंदर्भात अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि अभ्यास केंद्र तात्काळ सुरू करा अशी मागणी करणारे शिष्टमंडळ माजी आमदार अविनाश घाटे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू यांचे सोबत चर्चा करण्यात आली.यावेळी लवकरच त्याची घोषणा केली जाईल असे सुतोवाच कुलगुरू माननीय डाॅ.उद्धवजी भोसले यांनी केले.   

    यावेळी माजी आमदार अविनाश  घाटे , एम.बी.उमरे, गंगाधर कावडे, शिवा कांबळे,बालाजी थोटवे,प्रा.शिवाजी सूर्यवंशी, संजय मोरे,डॉ. लखन कत्तेवार आदींची उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *