गणेश उत्सव म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा तुमचा, आमचा सर्वांचा आवडता उत्सव. शाळास्तरावर गणेश उत्सवाची वेगळी ओळख असली तरीही आम्हा विद्यार्थ्यांमध्ये या गणेश बापाचं एक वेगळं महत्त्व आहे.
गणेश बाप्पा म्हणजे विद्येचे दैवत म्हणून त्यांची ख्याती आहे आणि म्हणून गणेश बाप्पाचे आगमन आणि गणेश बाप्पाचे विसर्जन हे निश्चितच आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.
मी स्वतः जेव्हा गणेशाचं आगमन होते तेव्हा मोठ्या उत्साहाने आमच्या परीवारात, घरी आम्ही तयार होऊन माझ्या मित्रासोबत, वडिलानं सोबत गणेशाची मूर्ती खरेदी करत असतो.
आणि केवळ खरेदी नसते तर भक्तिभावाने बाप्पांना घरी आणून श्रीचे सजावट डेकोरेशन आणि भक्तिभावाने समर्पण, दर्शन घेणे यामधून जो आनंद मिळतो तो मोजता न येण्यासारखा आहे. त्याबद्दल मी आता तुम्हाशी बोलत होत आहे.
माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हंटले जाते .हा गणपतीचा जन्म दिन म्हणून ओळखला जातो .उंदीर ज्याचे वाहन हातात. ज्याच्या अंकुश आणि परशु असे शस्त्र त्यालाच माझ्या महाराष्ट्रात श्री गणेश किंवा गणपती म्हणून ओळखले जाते .
गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनत्म हिंदू धर्मग्रंथ असलेल्या वेदात ऋग्वेदात मिळतो .गणेश चतुर्थी हा लहान मुलांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी मुले घरातील सर्वांपहिले अंघोळ करून गणपतीची मूर्ती बाजारातून आणण्यासाठी तयार होतात. हा दिवस माझा पण खूप आवडता आहे.
मला पण मूर्ती घेण्याची व घरामध्ये आणून देवळात गणपतीच्या आगमनाची तयारी करायला खूप आवडते , पण यावर्षी कोरोना सारख्या महामारीने सगळेच उलट सुलट करून टाकले आहे. गणपतीला डोक्यावर घेऊन मिरवत जाण्यापेक्षा या वर्षी पिशवीत ठेवून गणपतीला नेले गेले.
फार वाईट झाले पण गणपती बाप्पा कोरोना सारख्या महा मारीला हरवतील अशी माझी श्रद्धा आहे .आमच्या घरी फक्त एकचं दिवसाचा गणपती बसवला जातो आणि दुसऱ्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते .या दिवशी फक्त गणपतीच आठवणीत येतात.
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्धात भावनेने सुरु केलेल्या गणेशोत्सवाचे महत्व आजच्या बदलत्या काळात आणि परिस्थितीतही टिकून आहे आणि ते राहणे महत्वाचे आहे संकट काळात आपण कोणाची तरी धावा करतोच की म्हणून हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनेही साजरा करणेही काळाची गरज बनली पाहीजे असे मला वाटते .
असे असले तरी या उत्यवाचे मुळ हेतु माळ आजची पिढी विसरत असल्याचे वाटते . या गणेश उत्सवाच्या ११ दिवसात शांततापूर्ण वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेणे हा आपला प्रथम कर्तव्य आहे असे मी समजतो.
आपला गणपती बाप्पा निश्चितपणे ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे .गल्लीबोळामध्ये गणेश बापाची स्थापना करताना आजुबाजूला शाळा ,महाविद्यालय आहेत का हे पाहणे आपले कर्तव्ये आहे.आजकाल ज्या शाळेत विद्यार्थी शिकलायं त्या शाळेचे नियम न पाळता केवळ आपले मौजमस्ती करण्यात धन्यता मानतो.
हा उत्सव साजरा करताना देवाची आरती करताना शाळा व दवाखान्यातील रुग्णांना त्रास होणार नाही हे पाहीले पाहीजे.
श्री गणराय म्हणजे ज्ञान आणि बुद्धीची देवता मानली जाती हे खरं आहे .अशा या मांगल्यदेवता आणि बुद्धीदेवतेचा हा उत्सव असून या उत्सवाला ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे.हा उत्सव केवळ ११ च दिवस न होता हा जागतिक उत्सव होय.सिनेमा कथा कहाण्या मध्यून सतत हा उत्सव आपल्या समोर राहत असतो म्हणून गणेशोत्सव हा जगातील मोठा सामाजिक उत्सव बनला आहे.
आता आपले काही जबाबदाऱ्या आहेत ते पार पाडावे लागतील गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरुपात साजरा केला जातो.
तो साजरा करीत असताना पर्यावरणपूरक होईल आणि या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे.तरच आपल्या भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर विविध महोत्सव साजरा करणारा म्हणून आसणारी ओळख जपली जाणार आहे.
गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो खर तर तो टाळला पाहीजे .प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे या बाबीचा आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
मी किंवा माझे मित्र आपल्या गणेश बाप्पाच्या निरोप मिरवणूक मध्ये जातो तेव्हा ध्वनीक्षेपक आणि डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील वाद्यांमुळे काळजात धक होते .कःप तयार होतात वाटते दूर निघावे खरेच आपल्या गणेश बाप्पाला ही याःचा त्रास होतचं असेल ना ?
होणाऱ्या या ध्वनीप्रदूषणाने मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतील त्यामुळे यावर येणाऱ्या पिढीला जागृती होणे गरजेचे आहे.
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे तर महाराष्ट्राची ओळख दगडाच्या व मातीच्या देशा म्हणून ओळख आहे म्हणून विविध रंगाची व प्रकारची माती उपलब्ध आहे म्हणून माती व कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मूर्ती बनविल्या जाव्यात . या मूर्ती पाण्यात अगदी सहजपणे विरघळतील व होणारे प्रदूषणाला आळा बसणार आहे.
मातीच्या व कागदाच्या या मूर्तीना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला तर बरे होईल. इकोफ्रेंडली गणपती तयार करताना कागद, टिश्यूपेपर, माती, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्य वापरात येते.तर अशा हा पर्यावरण पुरक गणपती तुम्हा आम्हाला दिशा देणारे ठरावा .
जय हिंद
गणपती बाप्पा मोरया!
#अथर्व_दिगांबर_वाघमारे ,
#मानाचा_गणपती,#yugsakshilive.in