नांदेड जिल्हाभर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणार– खा.प्रतापराव पा.चिखलीकर

नांदेड   : 


भारतीय जनता पार्टी.नांदेड नेहमीच सामाजिक.शैक्षणिक.धार्मिक कार्यक्रम राबवत आसते.यावर्षी कोरोना महामारी मुळे मोठ्या प्रमाणात गुणवंताचा सत्कार  कार्यक्रम घेऊन पुरस्कार  वाटप न करता गुणंवत  विद्यार्थ्यांना घरपोच सत्कार करणार आहोत .कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ देण्यासाठी  आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनावे म्हणून नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे गुणंवत विद्यार्थ्यांचा घरपोच सत्कार करणार आसल्याचे  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी सागितले आहे.

नांदेड जिल्हा शैक्षणिक क्षेत्रांत  आतिशय चागली प्रगती करत आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी आय.ए.एस.आय.पी.एस मध्ये देशात झळकले आहेत.म्हणून  शिक्षणाचे महत्त्व आज दिसत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *