जागतिक नारळ दिवस

  २सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

जकार्ता,इंडोनेशिया येथे मुख्यालय असलेल्या एशियन अॅड पाॅसिफिक कोकोनट(APCC)यांच्याव्दारे प्रस्तावित २सप्टेंबर ही तारीख नारळदिवस म्हणून जाहिर करण्यात आली.खरे पाहाता नारळ हा जाट कुळातील एक वृक्ष आहे.

नारळाच्या झाडाचा उगम नेमका कुठे झाला असावा यामध्ये एकमत नाही.गंगेच्या त्रिभूज प्रदेशात म्हणजे सध्याच्या बांगला देशात,किंवा दक्षिण अमेरीकेत,अगदि आपल्या केरळमध्ये ही या झाडाचा उगम झाल्याची दाट शक्यता आहे.

याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते.ओल्या नारळाला शहाळे म्हणतात.आपल्या महाराष्ट्रात नारळाची लागवड मुख्यत:रत्नागिरी जिल्ह्यातील असून कुलाबा,ठाणे या जिल्ह्यात तसेच मुंबई उपनगरात नारळाचे थोडेफार क्षेत्र आहे. 

        आपल्या भारतीय संस्कृंतीत नारळाला अन्यय साधारण असे महत्तव आहे.धार्मिक कार्यात वापरतांना “श्रीफळ”म्हणतात.यंपाकघरातही विविध पदार्थ बनविण्यासाठी नारळाचा वापर केला जातो.नारळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.स्त्रीयांसाठीतर गर्भधारणेनंतर नारळपाणी एक प्रकारचे टाॅनिक आहे.

तसेच आठवड्यातून दोन तीन वेळेस नारळपाणी सेवन केल्यास बाळाचा रंग उजळतो.तसेच दिवसभराचा थकवा,ताणतणाव घालवायचा असेल तर नारळपाण्याचा फायदा होतो.शरीराचे वजन घटविण्यासाठी नारळाचा मोठ्याप्रमाणात फायदा होतो.

कारण,त्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्याने शरीरात कॅलरीज वाढत नाहीत,केसगळती,केसांची वाढ न होणे या समस्यावर खोबरेल तेलाचा हमखास फायदा होतो.केसामधील कोंडा देखील नाहीसा होतो.नारळ पाणी मानवी जीवनासाठी अमृततूल्य फळ आहे.

म्हणूनच शरीराला अत्यंत गंभीर आजाराविरुध्द लढण्याचे सामर्थ्य या नारळ पाण्याच्या माध्यमातून मिळते.उच्च रक्तदाबासारख्या गंभीर परिस्थीतीत नारळपाणी खूप फायदेशीर ठरते.एका नारळ पाण्यात सुमारे २००मिलि किंवा त्याहून अधिक पाणी असते.असा हा बहुगुणी नारळ आपला आरोग्य रक्षक आहे.

त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.जागतिक नारळ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य

नांदेड

९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *