पुणे :
टी व्ही 9 वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रायकर यांची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह अली होती. त्यानंतर तो विश्रांतीसाठी गावी गेला. पुन्हा थोडी तब्येत बिघडली. तेव्हा swab टेस्ट केली. ती पाॅझिटिव्ह आली. मग कोपरगावच्या हॉस्पिटल मध्ये गेला. तिथे 40 हजार रुपये ऍडव्हान्स भरायला सांगितले, आधीच चणचण असल्याने तिथे ऍडमिट न होता पुण्यात जम्बो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला. इथे दुर्लक्ष झाल्याने प्रकृती खालावत गेली.
खासगी हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नव्हता. अखेर काल संध्याकाळी मंगेशकर मध्ये बेड उपलब्ध झाला. तिकडे शिफ्ट करण्यासाठी कार्डियाक अम्ब्युलन्स हवी होती. ती पहाटेपर्यंत मिळू शकली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.