आठवणीतल विद्यार्थी : विजय विठ्ठलराव अतकूरकर

मार्च महिना १९८९ . दहावीबोर्डाची परीक्षा बहुधा याच महिन्यात होतात . हदगाव मध्ये त्यावेळी पंचशिल हायस्कूल व जि .प . हायस्कूल या दोनचं मोठ्या हायस्कूल होत्या . 

मार्च महिना १९८९ . दहावीबोर्डाची परीक्षा बहुधा याच महिन्यात होतात . हदगाव मध्ये त्यावेळी पंचशिल हायस्कूल व जि .प . हायस्कूल या दोनचं मोठ्या हायस्कूल होत्या . 

विजय विठ्ठलराव अतकूरकर

दोन्हीकडे विद्यार्थी संख्या भरपूर होती . जि.प . हायस्कूल मध्ये आठ  ते दहा वर्गाच्या चार चार तुकड्या होत्या . विद्यार्थी संख्या भरपूर होती . माध्यमिक शिक्षक म्हणून माझा कार्यकाल दोनवर्षाचा ही नव्हता . 

पण तेवढ्याच कालावधीत माझे विद्यार्थ्यांशी अपुलकीचे जिव्हाळ्याचे नाते जुळले होते . मी त्यांच्या बरोबर आनंदाने वावरत होतो . बहुधा नववी व दहावीचे विद्यार्थी माझ्या जवळ घुटमळत असत .

              शाळेचे मुख्याध्यापक व्ही . एल . अतकूरकर साहेब होते . त्यांची दोन मुले शाळेत शिकायला होती . एक विजय व दुसरा विनोद . विजय मोठा होता . 

दिसायला काळासावळा . गोलचेहरा . टपोरे डोळे . किंचित कुरळे केश . चेहरा थोडा भोळा वाटायचा . वागताना एखादी वेळेस लहरी वागल्या सारखा वागायचं .
 अतकूरकर सर म्हणायचे , ” राठोड थोडं विजय कडे लक्ष द्या . विनोद अभ्यास करतो . गृहपाठ करतो . 

पण विजय घरी काहीही करत नाही . लहरीपणा करतो ” . मी म्हणायचो , ” हो सर मी विजयला बोलतो . ” विजय शाळेत जेवढे शिक्षक होते त्या सर्वांशी चांगलं वागायचं .
 सर्वांशी चांगलं बोलायचं . पण त्यातल्या त्यात माझ्याशी व अवचार सरांशी अतिशय नम्रपणे , लिनतेने वागायचा . मला त्याच्या सर्व आडचणी सांगायचा .

             विजयने १९८९ मार्च मध्ये दहावीची परीक्षा दिली . त्यावेळी हदगावला एस.एस.सी . परीक्षेचे दोन केंद्रं होती . पंचशिल हायस्कूल व जि प . हायस्कूल . 

विजयचं परीक्षा केंद्र होतं पंचशिल हायस्कूल . विजयची अभ्यासात फारशी गती नव्हती . अभ्यास त्यांच्या मुडवर अवलंबून होता . पण त्याच्याअंगात प्रामाणिकपणा ठासून भराला होता . 

मुख्याध्यापकांचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बडेजाव नव्हता . त्यावेळी कॉपी करण्याची पद्धत प्रगती पथावर होती . पण विजयने कॉपी केली नाही . शेजारी मुलांकडे परीक्षेत ढूंकून ही पाहिले नाही . 

मी प्रत्येक पेपर झाल्यानंतर त्याला विचार असे , पेपर कसा गेला ? ” तो म्हणायचा , ” सर छान सोडवलोय  .” पण निकाल काय लागयचं ते लागलं . सर्वच परीक्षकांने विजयला दगा दिला. सर्वच विषय ही विजयवर रुसले होते . 
परीक्षक व विषय रुसण्याचं आणखी एक कारण होतं विजयचं हस्ताक्षर . विजयच हस्ताक्षर म्हणजे दिव्य होतं .कदाचीत परीक्षकांना त्याच हस्ताक्षर कळालं हीनसेल म्हणून तो नापास झाल असावं असं माझं मत बनलं होतं .
खरंतर त्यावेळी सर्व संस्था निकाल चांगलं लागावं म्हणून कसून प्रयत्न करायच्या पण विजय हा जि .प .हा .चा विद्यार्थी होता . विजय त्या प्रयत्नात सहभागी झालं नव्हतं .
              आता विजय जखमी वाघ होतं . नापास झाल्याचं त्याला सळत होतं . त्याने आक्टोबर १९८९ परीक्षेसाठी फी भरली . व मराठीसोडून सर्व विषयात पास झालं . माझ्या इंग्रजी विषयात त्याला बहुधा ५१ गुण मिळाले होते . तो खुप आनंदी होता . 

पण बोलताना महणायचं , “सर मी इंग्रजीत कच्चा नाही हो .माझी मराठी राहिली “. मराठी शिक्षकाला उगीच अरोपीच्या पिंजऱ्यात तो थांबवत नव्हता पण बोलताना नाराजी व्यक्त करायचा .

          अतिशय साधा भोळा वाटणारा विजय पुन्हा नव्या जोमाणे मार्च १९९० च्या परीक्षेस बसला . त्याचा नंबर जि .प . हायस्कूल मध्येच आला होता . 

त्याकाळी पळसा , तळणी व पळसाजवळच्या  खेड्याची एक शाळा होती .तेथील विद्यार्थी ही हदगावलाच परीक्षेला येत . 

आपआपल्या शाळेचा निकाल 30 % पेक्षा जादा लागावा म्हणून खाजगी संस्थेतील गुरुजीची धडपड असे . तर खेडेगावची पालकं आपलं लेकरू पास व्हावं म्हणून धोतर खोचुन परीक्षा केंद्राबाहेर थांबलेले असायचे .           
 दहावीची परीक्षा सुरु झाली . जि.प. हायस्कूल मध्येच परिरक्षकाचे कार्यलय असायचे . त्यावेळचे तत्कालीन गटशिक्षण अधिकारी साहेब परिरक्षक म्हणून काम करत होते . 

त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शिवराज रानबा कांबळे हे त्यांचे मदतनीस होते . कांबळे साहेबाना सर्वजण एसआर म्हणुनच ओळखत होते .
 कांबळे साहेबांनी मला परिरक्षक कार्यालयात काम करण्यासाठी घेतले होते . विजयचं परीक्षा क्रमाक जि .प . हायस्कूल मध्ये पहिल्या माळ्यावर उतरेकडील शेवटच्या हॉलमध्ये होतं . 
त्या खोलीचे दार दक्षिनमुखी होते . परीक्षा सुरु होवून एक तास झालं होतं . परीक्षा व्यवस्थित , सुरळीत चालू होती . शाळेच्या बाहेर कॉपी पुरविण्याऱ्यांची गर्दी जमलेली होती . 

त्याचवेळी कोणी तरी जोरात आरोळी ठोकली , ” अरे पळापळा बोर्डाची गाडी आली , गाडी आली ” हे ऐकूण बाहेर जमलेली मंडळी पांगली . पोलीस ही सतर्क होवून शाळेभोवती चक्कर मारू लागले .               
बोर्डाच्या गाडीतून पथक उतरले . तीनचार माणसांचं पथक होत ते . ते इमारतीत आल्याबरोबर लगबगीने परीक्षा दालनात घुसले . 
ज्या मुलांनी कॉपी आणली होती त्यापैकी काहीनी खिडकीतून बाहेर फेकली . काहीनी परीक्षा दालनाच्या कोपऱ्यात फेकली . तर काही ” प्रामाणिक ” पर्यवेक्षकांकडे सोपविले . 

विजय जवळ कॉपी नव्हती . तो शांतपणे लिहीत होता . कोण आलय कोण चाललय याकडे त्याचे लक्ष नव्हते. मी परिरक्षक कार्यालयात काम करत असल्यामुळे मी ही सहज एखादी चक्कर मारायचो .              
मी आता बोर्ड सदस्य सुरेशराव कदम यांच्या सोबत होतो . ते लिंबगाव ता. जि . नांदेड येथे विज्ञानचे शिक्षक होते . ते माझ्या मुखेड तालुक्यातील असल्यामुळे मी त्यांच्या सोबत होतो . 
कदम सरच्या चावीला पातळ स्टीलची चैन होती . ते हातात धरून ती चैन बोटाभोवती गुंडाळत होते . चैन फिरवत होते . 

कदाचीत ती त्यांची चैन फिरवायची स्टाईल होती .कदमसर व मी विजय परीक्षा देत असलेल्या दालनांत शिरलो . विजय खाली मान घालून लिहीत होता . 
त्याचे लक्ष कोणाकडेच नव्हते . त्याच्या बाजूला नवनित अपेक्षित प्रश्नसंचचा एक घडी करून ठेवलेला कागद कदम सराना मिळाला . 

कदम सर तो कागदाचा तुकडा उचलला व विजयची उत्तर पत्रिका ही काढून घेत चढ्या अवाजात विचारलं , ” काय रे कॉपी करतो का ? ” विजय अतिशय भोळा सहज साळसूदपणे म्हणाला , ” सर मी कॉपी केलेली नाही . माझ्या उत्तर पत्रिकेत बघा मी त्यातलं काहीही लिहिलेलं नाही .” विजयच्या बोलण्यात नम्रता होती .

 कदम सर म्हणाले , ” हे कागज तुझ्या बेंचवर कसे ? ” विजय म्हणाला , ” सर हे कागद माझ्याच शाळेतील एका शिक्षकांने मुद्दाम ठेवून गेलेलं आहे . ” विजयने त्या शिक्षकांचे नाव बिनधास्तपणे सांगितले . कदम सरानी त्या शिक्षकाला बोलून घेतले . त्यांची बरीच झाडाझडती घेतली . मुख्याध्यापक साहेबाना ही बोलावून त्या शिक्षकास समज देण्यासाठी विनंती केली.
               विजय हा दिसायला साधाभोळा आहे . त्याचा चेहरा निरागस आहे . त्याच्या वागण्या बोलण्यात लिनता आहे .  घरात एखादी वेळेस विजयची सटकते हे मला माहित आहे. पण ते ” सरकणे , सटकणे” फारकाळ टिकत नाही 

. पुन्हा तो सर्वात मिसळतो . तो तात्काळ मागचं सर्वच विसरून जातो . असा हा विजू . दहावीला असताना “राठोड सरच फक्त माझे गुरुजी आहेत ” म्हणनारा विजू हा कंधाराला एका मतीमंद शाळेत सेवक म्हणून काम करत आहे . 

त्याच्या प्रामाणिक वागण्यचं फळ त्याला मिळालेलं आहे .

राठोड एम . आर . (गुरुजी )
 गोमती सावली ,
 काळेश्वरनगर , विष्णुपूरी, 
नांदेड९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *