प्राथमिक आश्रम शाळा बीजेवाडीचे मुख्याध्यापक हाळदे यांचा सेवानिवृती बद्दल सत्कार संपन्न

कंधार:-
तालुक्यातील सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित. प्राथमिक आश्रम शाळा बीजेवाडी ता.कंधार येथील मुख्याध्यापक श्री हाळदे जि.जी. यांनी 31वर्षे 3 महिने सलग सेवा करून दि. 31.8.2020रोजी 
नियतकालीन वयोमानाने सेवानिवृत्त झाले. माध्यमिक आश्रम शाळेच्या प्रांगणात निरोप समारंभाचे आयोजन केले होते. 

त्याप्रसंगी अनेक मान्यवरांचे. सहकाऱ्यांनी सरांसोबतचे अनुभव.. आठवणी, मनोगतातून व्यक्त केल्या. संस्थमध्ये सरांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू,स्पष्ठवक्ते, हजारजवाबी,आदर्श घेण्यासारखे होते. कार्यक्रमास अध्यक्ष शाळेचे मु. अ. कचरे बी. के होते , शिंदे व्ही. एस,देगावकर आर. बी ,अंकमवार सर , राठोड बी. एम, चव्हाण पी. बी., कदम वाय. एस,. कल्याणकर एस. एम.,.. टिमकीकर आर. एम, तसेंच मा. आश्रम शाळा गांधीनगरचे प्रा. माधव गिते.,बंडेवाड एस. एस., मेहरकर एस. एच. तसेंच आश्रम शाळेचे व्यवस्थापक वाडकर व्ही. डी. आणि शिक्षकेतर कर्मचारी मोरे बळीराम,चव्हाण शिवाजी, सामाजिक कार्यकर्ते पप्पू माधव गव्हाणे,उपस्थित होते.
सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे भावी आयुष्य सुखी.. आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *