उघडा डोळे बघा नीट , दोन शाळा , ग्रामपंचायत व दवाखान्यासाठी रस्त्याअभावी करावी लागते पायपीट.

 

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ हे जि.प. गटाचे गाव असून येथील जि.प.के.प्रा.शाळा , प्रा.आ.उपकेंद्र , पशुवैदकिय दवाखाना , ग्राम पंचायत कार्यालय व श्री बसवेश्वर विद्यालय येथे जाण्यायेण्यासाठी सर्वांनाच एकच रस्ता असुन या रस्ताची गेली अनेक दिवसांपासून दयनिय अवस्था झाली आहे .

या रस्तावरुन चालताना विद्यार्थी , ग्रामस्थ , रुग्णांना तारेवरची कसरत करावी लागते , येथूनच एक राष्ट्रीय महामार्ग व एक राज्य मार्ग जातो या महामार्गावरुन जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक अधिकारी ,पदाधिकारी , लोकप्रतिनीधी यांच्या सहज लक्षात येईल असा रस्ता असुन या रस्त्याकडे बघीतलेतर एखादा पानंद रस्तातरी चांगला असेल अशी अवस्था तयार झाली असल्याने उघडा डोळे बघा नीट , दोन शाळा , ग्रामपंचायत व दवाखान्यासाठी रस्त्याअभावी करावी लागते पायपीट अशीच प्रतिक्रिया ग्रामस्थ , पालक यांच्यातून ऐकायला मिळत आहे.

या शाळेकडे जाणाऱ्या रस्तावरुन जानारे पहिली ते दहावी पर्यतचे मुल ,मुली , प्रा.आ.उपकेद्र ला जानारे रुग्ण व नातेवाईक , पशुवैदकीय दवाखान्याला जानारे पशु पालक , व ग्रा.प. कडे जानारे गावातील नागरीक असो कि या शाळेला ,दवाखान्याला ,व ग्रा.प. ला भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांची वाहने येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास वर खालीच थांबुऊन पाय पिट करीत या खडतर रस्तावरुन जावे लागते.

 

ते अधिकारी पायपिट करीत जातीलही पण हे चिमुकल्या जिवाचे काय हाल होत असतील हे कसे लोकप्रतिनिधीला व त्या अधिकाऱ्यांना दिसत नाही..? यासंदर्भात अनेक वेळा लोकप्रतिनीधीकडे ,संबधित विभागाकडे या रस्ताविषयी समस्या ही गावकऱ्यांनी मांडली पण आजपर्यत तरी कुणी याची दखल घेतली नाही. निवडणुका आल्या की मोठमोठी आश्वासने देणारी नेते मंडळी तुमच्या गावासाठी अमुक करु – तमुक करु अशी गर्जना करतात मग रस्ता त्यांना दिसत नाही का..? अशी पालक वर्गातुन व गावकऱ्यांतून चर्चा होत आहे . निवडणुका जवळ आल्याकीच त्यांना सर्वच रस्ते दिसतात , गावाचा विकास खुंटल्याचे दिसते तर मग आत्ता का नाही..? असा सवालही जनता करीत आहे.

 

आता नुकतेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात झाले असून आतातरी संबंधित अधिकारी , विभाग व लोकप्रतिनिधीनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *