ऍड.बाबुराव पुलकुंडवार यांच्या हस्ते मनोविकास विद्यालय कंधार येथील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

मनोविकास माध्यमिक विद्यालय कंधार येथील वतीने इयत्ता १०वी च्या ९०%पेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या एकुण २७ व ईयत्ता १२वी च्या एकुण २० विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार मनोविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.बाबुराव पुलकुंडवार ,ऊपाध्यक्ष अॅड.लक्ष्मीकांत मुखेडकर ,मुख्षाध्यापिका व्ही . व्ही . सरनाईक व उप.मु.अ.श्री.बंडेवार सर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

मनोविकास माध्यमिक विद्यालय कंधार येथील इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी मार्च 2023 रोजी लातूर बोर्डाची परीक्षा दिली होती.सदरील परीक्षेमध्ये 27 विद्यार्थी 90% टक्के पेक्षा जास्त टक्केवारीत उत्तीर्ण झाले आहे,तर 75 टक्के पेक्षा जास्त 109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .शाळेचा निकाल 96.90% टक्के लागला आहे.

विद्यालयातून अबरार अहमद खलील अहमद या विद्यार्थ्याने 99.40% टक्केवारी घेऊन शाळेमध्ये सर्वप्रथम आला .

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.पतंगे,पुलकुंडवार,मामडे,पवार,तेलंगे,कल्याणकस्तुरे,बिल्लावार,शेट्टीवार,शेळके,मोरे,कु.देशपांडे तसेच सर्व शिक्षक बंधु भगिनींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.घोडेकर सरांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *