कंधार ; प्रतिनिधी
आज २१ जुन जागतिक योग ( आंतररास्ट्रीय योग दिन ) निमित्य कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत विद्यार्थांना योगाचे धडे व मार्गदर्शन करण्यात आले . मुख्याध्यापक वाघमारे डि . जी यांच्या मार्गदर्शनाखाली योगशिक्षिका तथा शाळेच्या शिक्षिका सौ उषा कागणे यांनी प्रात्यक्षिके सादर केली . विद्यार्थांनी भरभरून प्रतिसाद दिला . शाळेचे शिक्षक आनंदा आगलावे , राजु केंद्रे , बालकताई चंद्रकला तेलंग आदीनी परीश्रम घेतले .