कोरोना काळात कपाटातील ड्रेसेसचे बोलकं शल्य…..! शल्यकार—दत्तात्रय एमेकर गुरुजी

कोरोना काळात कपाटातील ड्रेसेसचे बोलकं शल्य…..!
शल्यकार—दत्तात्रय एमेकर गुरुजी

युगसाक्षी ;कंधार

करोना संसर्गजन्य महाभयान रोगांने जगभर थैमान घातले आहे.आपल्या देशातही या विषाणुचा कहर पाहवयास मिळतो आहे.या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशाचे सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी दि २१ मार्च रात्री ८ च्या सुमारास जनता कर्रफ्युची घोषणा केली.त्यानंतर दोन दिवसांनी देशाला संबोधित करतांना २४ मार्च २०२० रोजी २१ दिवसाचा लाॅक डाउन घोषित केले.पण माझी खरच फार अवहेलना झाली असे म्हणावे वाटते.सर्व कार्यालय ओस पडली,शाळा तर बंद झाल्या,सर्व बाजार बंद झाल्यामुळे पुर्ण देशच थांबला.कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सर्वजण घरीच बसुन राहिले.
दोन-चार दिवस तेव्हढेस कांही वाटले नाही.पण लाॅकडाऊन- १ गेला नंतर लाॅक डाऊन -२परत लाॅक डाऊन-३ मग अनलाॅक-१ आणि अनलाॅक-२ जवळपास १०० ते १२५ दिवसाच्या कालावधित माझा म्हणजे कपाटातील ड्रेसचा वनवासच झाला म्हणावे लागेल.माझ्या प्रत्येक ड्रेसचा नंबर एकदा तरी येत असतो.पण परिस्थितीच स्टे होम, स्टे सेफ या मुळे माझी दमछाक होत आहे.महिनो महिने माझा नंबर लागत नाही.धुणे,इस्त्री,घडी हे मिळणे दुरापास्त झाले.कपाटातील हॅन्कर देखील मला लटकुण धरातांना नाका नवू आली आहेत.जणुकांही मला पारतंत्र्यात रहावे लागते आहे.कांही दिवसांनी मला लहान झाले म्हणुन फेकुन देण्याची वेळ येवू नये म्हणजे झालं.माझ्यामुळे माझ्या मालकांचे व्यक्तीमत्व चमकदार दाखवण्याचे दिवस संपलेत की काय?असे म्हणण्याची वेळ येते की काय?याची भीती वाटते आहे.
एवढे काय?मी कपाटातला कपाटात,दुकानातले दुकानात,टेलर्स जवळील टेलर्सच्या दुकानात तर मला निर्माण करणारे दुकानातील रेडीमेड व कापड आहे त्याच ठिकाणी.सदरी परिस्धितीने मी तर पार भांबावलोच आहे.कधी एकदाचा महामारीचा कालखंड संपुन मला स्वातंत्र्याचे जगण केव्हा माझाया वाट्याला येते का?:”गेले ते दिवस, राहिल्या आठवणी” ही उक्ती माझ्या जीवनात खरी ठरु नये म्हणजे झाले.माझ्या मालकांना आली लहर तेंव्हा माझा वापर करुन घराच्या बाहेर शतपावली करुन मला लगेच अंगावरुन काढल्याने अतीव दु:ख होत आहे.पुन्हा त्यास सॅनिटाईझर करुन पुन्हा बंदीखाना कपाटात कोंबल्या जाते.हे झाले सर्व सामान्यांचे तर पुढारी व नेते मंडळींचे शुभ्र पांढरे स्टार्च केलेले माझे मित्र तर त्या कडकपणात संपण्याची वेळ आली असेच वाटते.विविध प्रचारात,विचारपिठावर,पक्षांच्या कार्यक्रमात,उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांची छबी माझ्या आणि माझ्या मित्रांमुळेच व्यक्तीमत्व खुलते.ते सर्व रद्द झाल्याने माझा जिव चक्क गुदमरतोय…!
मला डाॅक्टर मंडळी,पोलिस बांधव,सिस्टर,बाॅईज,सफाई कामगार आणि लेखनी बहाद्दर पत्रकार बांधव,मेडिकल्स दुकानदार.किराणा दुकानदार यांच्या शिवाय कोणीच नवनविन मला अंगावर परीधान करीत नाही.त्यातच डाॅक्टर,नर्स व बाॅईज आणि आरोग्य विभागतील कर्मचारी माझ्यावर पीपीई सुरक्षा किट घातल्याने मला ब॔दीस्त वाटत आहे.शाळेतील विद्यर्थ्यांचे गणवेश तर धायमोकलून रडत आहेत.शर्ट एकीकडे पॅट दुसरीकडे स्कूलबॅग तिसरीकडे तर मोज्याचा पत्ताच नाही.अशी बकाल अवस्था या कोरोना विषाणुने करुन टाकली.माझी अन् मानवांची जणुकांही फारकतच झाली आहे.अशी सध्याची परिस्थिती माझ्यासाठी “न भुतो न् भविष्यती”! अशीच दिसते.हे खेदाने सांगावे वाटते.केंव्हा पुर्वीची स्थिती येईल का नाही? याची धास्ती माझ्या मनाने घेतली आहे.एव्ढच काय माझ्यासाठी लागणारे टेलरिंग मटेरीयल देखील आपापल्या जागी दुकानात दुःखाच्या यातना भोगते आहे.भुतपुर्व चार महिन्यापासून..भीमजयंती,म.बुध्द पौर्णिमा,गुरु पौर्णिमा,राम नवमी,हनुमान जयंती,गुढी पाडवा, १ मे महाराष्ट्र दिन,नाग पंचमी,गुड फ्रायडे,संपुर्ण लग्न समारंभ या सारख्या सण-उत्सात माझा बोलबाला असायचा पण…..शासनाच्या लाॅक डाऊन व अनलाॅक नियमाने माझ्या मालकांना घरीच सुरक्षित रहावे लागल्याने माझ्यावर ही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याने, या कोराना महामारीने माझं अस्तित्व तुरळक करुन टाकले.मला खरेदी करतांना अगदी दुकानावर झंबड पडली असती.
मला एक शब्द चारोळी सुचते आहे…
व्यक्तीमत्व ठळक करणारी ड्रेसेस।
शब्दातुन बोलकं शल्य मांडतो आहे॥
कोरोना महामारीच्या कालखंडात।
माझे अस्तित्व डबघाईस आले आहे॥
माझी विदारक परिस्थिती पाहून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे दत्तात्रय एमेकर गुरुजींनी मला बोलके करुन माझे दुःख आपल्या पर्यत पोहचवले आहे.लवकरात लवकर जर परिस्थिती सुधारली तर बरे होईल अन्यथा माझे अस्तित्व अगदी छोटे म्हणुन मला कपाटातल्या कपाटात “रिटायर्ड हर्ट”
होण्याची नामुष्की येते की काय?याचीच धास्ती वाटते आहे.आता मी थकलो आहे.माझ्या मनात कदखदणारे शल्य आपल्या पुढे मांडल्याने थोडे मनाला हलकं वाटते आहे.
शल्यकार–दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार
बोलाबोला-9860809931

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *