नांदेड, दि. 24 ः पिठापूर येथील महासंस्थान असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ पादुका पालखीचे आज शहरात भक्तांनी भव्य स्वागत केले.
पीठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुका असलेली पालखीचे शहरात सायंकाळी 7.15 च्या सुमारास आगमन झाले. कलामंदिर येथून वाजतगाजत व पुष्पवृष्टी करत पालखीचे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विश्रामासाठी श्रींच्या पादुका सोमेश कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये ठेवण्यात आल्या. पादुका पालखीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर सौ.जयश्री पावडे, माजी महापौर सौ.शैलजा स्वामी, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, ॲड. निलेश पावडे, संतोष पांडागळे, डॉ. अंकुश देवसरकर, दिनेश बाहेती, सौ. रंजना सावंत, सौ. मृणाल राजूरकर, सौ.अपर्णाताई नेरलकर, संतोष मुळे, दीपक पाटील, ऋषिकेश नेरलकर, श्रीकांत गुंजकर, डॉ. आशितोष राजूरकर, पूनम सावंत, सौ. मैथिली कुलकर्णी, दर्शन राजूरकर, नंदकुमार कोसबतवार, संजय देशपांडे, सौ.सविता बाहेती, सौ. संगिता गुंजकर, सुरेश कुलकर्णी, अशोक ठावरे, निशिकांत धांडे, अनिरुद्ध कुलकर्णी, सौ.अल्का कोटीखाने, अनिरुद्ध कोटीखाने, श्री स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष सुनील शर्मा, श्रीनिवास चौधरी, मंजू कोसबतवार, शुभांगी देवसरकर, चंद्रकांत गव्हाणे, विजय हुरणे, गजानन पिंपरखेडे, डॉ.सुनील कुलकर्णी, सौ.पुष्पा दीक्षित, गायत्री राजूरकर आदींची उपस्थिती होती.