कंधार ; प्रतिनिधी
कंधार-आंबुलगा टोकवाडी- नावयाचीवाडी-बोरी कागणेवाडी-कळका मंगनाळी व कंधार-घोडज-गणविड बाबुळगाव-हाडोळी (ना.) आदि सामने चालू नसल्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्याना येण्यासाठी बस सेवा चालू नसल्यामुळे पायी चालत ४ कि. मी. अंतरावर यावे लागत आहे.
खाजगी वाहनानी विद्यार्थ्यांची व नागरिकाची मोठ्या प्रमाणात लूट करत असून त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत
आहे. विद्यार्थ्याना ऑटो रिक्षाने जिव घेण्या प्रवास करावा लागत आहे. तरी में. साहेबांनी तात्काळ वरील मार्गाने बस सेवा सकाळी ९ वाजता व दुपारी ४ वाजता सुरु करावी. अन्यथा संभाजी बिग्रेडच्या वतीने आपल्या आगाराच्या समोर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे .
यावेळी उपस्थित बळिराम पाटील पवार मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष नितीन पाटील कोकाटे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कंधार विकास पाटील लूगारे संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष शिवा पाटील तोंडचिरे तालुका संघटक
ज्ञानेश्वर पाटील गायकवाड
तालुका उपाध्यक्ष दत्ता माधवराव केंद्रे
व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .