चुक ती चुकच.. माणसं आहोत चुकणारच पण त्या चुकीमुळे जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा मात्र आपल्याला अपराधी वाटतं..
कालचीच गोष्ट , कोण होणार करोडपतीवाले घरी AV शुट ला आले होते.. त्या गडबडीत माझ्या हातुन काचेचा ग्लास फुटला .. नेहमीप्रमाणे मी बॅगेत भरुन ती बॅग ड्स्टबीन पाशी ठेवली म्हणजे दुसऱ्या दिवशी मावशी आल्या की त्यांना सांगता येइल.. असं कधी काही काचेची वस्तु फुटली तर मी लक्षात ठेवुन मावशीना सांगते.. काल आमच्याच गार्डन मधे शुट सुरु होतं त्या गडबडीत ती बॅग उचलली आणि ड्स्टबीन मधे टाकली आणि थोड्या वेळात कचरा न्यायला कोणीतरी पुरूष आला.. पाच मीनीटात ती व्यक्ती परत आली आणि म्हणाली , मॅडम हाताला काच लागली.. एक थेंबच रक्त आलं होतं पण ते माझ्यामुळे आलं होतं.. माझ्या हातुन अशी चुक कशी काय होवु शकते ??.. लगेच हळद लावली , त्यांची माफी मागितली पण दिवसभर चुटपुट मनाला लागुन राहिली..
तीही माणसं आहेत , हे शेअर करण्यामागे एकच उद्देश आहे की अशा वस्तु कचऱ्यात टाकताना काळजी घ्या.. सॅनीटरी नॅपकीन नीट पॅक करुन टाका.. बऱ्याचदा कचरा वेचणारे त्या डब्यात उभे असतात… नकळत घडली तरीही ती चूकच असते…आपल्यामुळे कोणाचा फायदा झाला नाही तरी चालेल पण नुकसान आणि त्रास होता कामा नये याची काळजी घेउया..
सोनल गोडबोले
.