नांदेड, ः अधिक श्रावणमासच्या निमित्ताने राष्ट्रसंत सद्गुरु ष. भ्र. 108 डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेतून नांदेड येथे जुलै महिन्यात होणाऱ्या अधिक श्रावणमास अखंड शिवनाम सप्ताहाचे शिवाचार्यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निमंत्रण दिले.
अधिक श्रावणमासनिमित्त दि. 18 जुलै ते 25 जुलैदरम्यान समस्त शिवाचार्य गण व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव पाटीजवळील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालयात अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या शिवनाम सप्ताहात शिवपाठ, परमरहस्य पारायण, प्रवचन, वचन साहित्य, गाथा भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी आ. सौ.अमिताताई चव्हाण यांना संयोजन समितीतीत शिवाचार्यांनी शिवाजीनगर येथील निवासस्थानी भेट देऊन निमंत्रण दिले. यावेळी सर्व शिवाचार्यांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आशीर्वाद घेतला. या निमंत्रण भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.