25 जुन 1975 या भारतीयांच्या नेत्री अश्रूं तर 25 जुन 1983 रोजी भारतीयांचा विश्वकप विजेता झाल्याने जल्लोष!

कंधार ; प्रतिनिधी

आपल्या भारतात भूतपूर्व ऐतिहासिक घटना घडल्या त्यात
आणीबाणी (Emergency) हा इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा 21 महिन्याच्या कालखंडात तत्कालिन पंतप्रधान इंदिराजींच्या कालखंडात आणीबाणी जाहीर केली.देशाचे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविनाच्या कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली.ती अणीबाणी 21 महिने चालली पासून लागू झाली. त्या आणीबाणीचा विरोध करतांना अटल बिहारी वाजपायी,जय प्रकाश नारायण,जाॅर्ज फर्नांडीस,आपल्या मन्याड खोर्यांच्या भागात क्रांतिभुवन बहाद्दरपुर नगरीतील शे.का.प.नेते डाॅ भाई केशवरावजी धोंडगे यांच्या नेतृत्वात आणि भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांच्या सहकार्यात तेरा आणीबाणी विरोधी लढा देणार्या भाई राजेश्वरराव आंबटवाड,भाई पंढरीनाथ कुरुडे,भाई संभाजीराव केंद्रे,भाई अॅड. बाबुराव पुलकुंडवार,भाई रोहिदास सर्केलवाड,भाई रामराव पेठकर,भाई शंकरराव जाधव,भाई बापुराव वाडीकर आदींनी मिसा अंतर्गत नाशिक जेल भोगली.त्या सहभागी वीर सत्याग्रहींना महिना दहा हजार पेंन्शन सुरु झाले.त्यांच्या लढवय्ये वृत्तीस मानाचा मुजरा.त्या नंतर देशात निवडणुका होवून गैर काॅग्रेसी पंतप्रधान मुरारजी भाई देसाई झाले.

या दिवशी पण इ.स. वेगळे इंग्लड येथे क्रिकेटची पंढरी लाॅडर्सवर वेस्ट इंडीजवर विजय मिळवत कपिलदेवच्या नेतृत्वात वल्ड कप जिंकला.या संघातील सर्व भारतीय क्रिकेट खेळांडूंचे मनापासून अभिनंदन,या भारतीय संघाचे अभिनंदन करणायासाठी मन्याड खोर्यातील क्रिडाप्रेमींनी जल्लोषात कंधारच्या मुख्य मार्गावरुन विजयी मिरवणुक भारतीय संघातील खेळाडूंच्या चित्रासह काढली होती.


सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *