LOVE VITAMINs…
गेली आठ महीने Indigenous Nutrition चा क्लास सुरु होता आणि आता त्याची फायनल परीक्षा..
कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर डोचकं चालेना, निसतं भनभन करतय.. हे सगळं फक्त अभ्यासानेच नाही बरं का ,
weekend आहे , या सीझनचा पहिला पाऊस सुरु झालाय वातावरण रोमॅन्टिक आणि मी हातात पेन कागद घेउन बसलेय..
एका मित्राचा फोन आला , सोनल वाईन प्यायला बसणार आहोत , येतेस का गं ?? त्याला म्हटलं ,अरे अभ्यास करतेय,, कशात कुठलं व्हायटामीन असतं आणि कशात प्रोटीन असतं काहीही डोक्यात शिरत नाही , त्यावर तो म्हणाला , तुला फक्त love vitamin माहीत आहे त्यामुळे इतर विटामिन तुझ्या डोक्यात शिरत नाहीत तर डोक्यात जातात.. सगळ्या प्रश्नांना तेच उत्तर लिही.. त्याची आयडीयाची कल्पना खुप आवडली..मी मनोमन हसले , आणि बाहेर पाऊस माझ्यावर हसत होता..
त्याच्या हातातुन फोन दुसऱ्या मित्राने घेतला आणि म्हणाला ,तु तयार हो गं .. आम्ही पिकअप ला येतोय. मी म्हटलं , अरे तुम्ही एंजॉय करा .. काठावर तरी पास होवुदेत की..त्यावर तो म्हणतो , कोण सांगतं गं तुला नको ते उद्योग करायला या वयात परीक्षा देवुन कुठे जायचय..तुझा पाऊस मित्र रुसुन निघुन जाईल.. त्याना म्हटलं आधीच या मिनरल्स आणि विटामिननी वात आणलाय आता तु डोकं नको खाऊ असं म्हणुन फोन ठेवुन दिला.. आणि सोफ्यावर बसुन love vitamin वर विचार करायला लागले.. याच्या इतकं पॉवरफुल विटामीन या जगात नसेल आणि ज्याला ते अनुभवायला मिळतं त्यासारखा भाग्यवान कोणीच नाही..शिकत रहाणं थ्रील आहे आणि प्रेमात रहाणं सॉलीड फील आहे..
सल्फर लीव्हर क्लीनींगसाठी उपयुक्त आहे आणि प्रेम heart cleaning साठी उपयुक्त आहे..लिंबाची साल ॲंटीकॅंसर आहे आणि प्रेयसीची मिठी कॅंसर लाजवळच येवु देणार नाही.. vitanin c ॲंटीएजींग आहे आणि love vitamin ?? तुम्हीच शोधा.. २७ / ७ प्रेमात रहाण्याचं सुख काय असतं हे फक्त प्रेमवीर सांगु शकतात..ही सगळी नापास होण्याची लक्षणं आहेत हे मात्र नक्की.. माझ्या मित्रांसारखे शिक्षक असतील तर या देशाचे भविष्य काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी..
देवा ,,कसं होणार या परिक्षेचं ?? .. लयीच अवघड हाय समदं . तुम्ही घ्या पावसाची मज्जा.. मी अभ्यास करते.. या कोर्स नंतर अजुन नवीन कोर्स करायचा कीडा डोक्यात वळवळ करतोच आहे. अंगात .कीडे कमी नाहीत ..
सोनल गोडबोले