मोठ्या दिलाचा राजा : राजर्षी शाहू महाराज: जयंती विशेष 26 जून प्रासांगिक लेख

राजर्षी शाहू महाराज हे प्रजाहितदक्ष संस्थानिक होते. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजात जागृती निर्माण केली. आणि चिरस्थायी आणि कल्याणकारी कार्याला अतिशय महत्त्व दिले. त्यामुळेच समाजात परिवर्तन झाले त्यासाठीच त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा केलेला शब्द प्रपंच. ………
आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर सामाजिक प्रतिष्ठेचा लढा ही महत्त्वाचा होता या लढ्यात संरजामशाही. सामाजिक विषमता ,आर्थिक शोषण यासारख्या गोष्टीला विरोध करावा लागला ,शेतकरी ,कष्टकरी, कामकरी मजूर, दलित स्त्रिया यांना समानता द्यावी लागेल म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी महत्त्वाचे योगदान दिले. निर्बलाचे रक्षण करणे हीच बलाची खरी एकात्मता आहे, म्हणून त्यांचे काम निरंतर चालू होते, शक्ती पेक्षा त्यांनी युक्तीला जास्त महत्त्व दिले
*भुकेने कासावीस झालेले पोट व अन्यायाने तडफडणारे मन यातूनच क्रांतीचा जन्म होतो असे ते स्पष्टपणे म्हणत असत,* गवताच्या काडीला महत्त्व नसून गवताच्या पेंढीला महत्त्व आहे असे ते अनुभवातून बोलत होते, घोड्यांना हरभरा खाऊ घालण्यासाठी त्यांनी एकाच ठिकाणी सर्व घोडे सोडले होते त्यावेळी बलवान घोड्यांनी कमी बलवान असणाऱ्या घोड्यांना हरभरा खाऊ दिले नाहीत ?त्यावेळी शाहू महाराजांना युक्ती सुचली अरे …कमी बलवान असणाऱ्या घोड्यांचा हरभरा (खुराक) बाजूला ठेवू म्हणजे ते आपोआप नंतर खातील आणि जीवन जगतील, यातूनच 1902 मध्ये आरक्षणाचा जन्म झाला म्हणून तर त्यांना *आरक्षणाचे जनक* म्हणतात-22 फेब्रुवारी 1918 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या गॅझेट मध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून तेथील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली.बारा बलुतेदार व अठरा आलूतेदार ही पद्धत बऱ्याच वर्षापासून चालत आली होती. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जातीनुसारच व्यवसाय करावा, इतर कोणताही व्यवसाय करू नये. परंतु ही पद्धत चुकीची आहे हे शाहु महाराजांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी ही पद्धत कायमचीच बंद करून टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे सर्व जातीतील लोकांना कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे व्यवसाय स्वातंत्र्य मिळाले आणि समाज सामाजिक गुलामगिरीतून कायमचाच मुक्त झाला म्हणून महाराजांचा जन्म दिन *समता दिन* म्हणून साजरा करतात नेहमी ते रोटीबंदी, बेटी बंदी,व व्यवसाय बंदी यावर कडक निर्बंध घातले. आंतरजातीय विवाहस त्यांनी मान्यता दिली, संस्थानात आंतरजातीय विवाहस मान्यता देण्यात येणारा कायदा मंजूर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शाहू महाराजांनी पाठ राखण केली. त्यांचे नेतृत्व मान्य केले. वेदोक्त प्रकरण अतिशय सावधगिरीने हाताळले.
संयम ठेवून सर्वांना सोबत घेतले समाजात कसल्याही प्रकारचा सामाजिक उद्रेक होऊ दिला नाही. म्हणून त्यांना *मोठ्या दिलाचा राजा* असे संबोधले जाते. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा प्रसारित केला, त्यामुळे लाखो लोकांना त्यांचा फायदा झाला ,सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे आज त्यांचे नाव घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले.कधीही कोणाला जातीवरून बोलले नाहीत. उलट त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांबरोबर राहिले. त्यांच्यासोबत त्यांनी भोजन केले. रोटी बंदी जाहीरपणे धुडकावून लावली आणि प्रत्यक्ष इतर लोकां बरोबर राहू लागले. त्यांच्या हत्तीचा माहुत तसेच गाडी चालक, अंगरक्षक हे सर्व मागासवर्गीय होते. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कुस्ती या खेळाला अतिशय महत्त्व दिले अनेक पैलवान तयार केले त्यामुळे कुस्तीसाठी आज कोल्हापूर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसेच मौज, मजा ,आनंद लुटण्यासाठी त्यांनी शिकार केली नाही तर हिंस्र प्राण्यांची माणसाला त्रास देणाऱ्या प्राण्यांची ते शिकार करत, त्यांनी कलाकारांना राजाश्रय दिला. अल्लादिया खाॅ गानमहर्षी बाब पेंटा रकर सारखे चित्र महर्षी आणि गोविंदराव सारखे पेटीवादक यांचे महाराजांना कौतुक वाटे असे अनेक कलाकार त्यांच्या दरबारात आपल्या कला सादर करत होते. महाराजांचे व्यवहार ज्ञान अतिशय चांगले होते संपूर्ण संस्थानचा हिशोब ते ठेवत असत. शेंवग्याच्या शेंगाचा हिशोब त्या काळात अतिशय गाजला होता,लाच खाऊ अधिकार्‍यास त्यांनी शिक्षा केल्या. मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला तरच तो सर्वसृष्टीत श्रेष्ठ ठरेल म्हणूनच महाराजांनी पशु ,पक्षी, वृक्ष ,वनस्पती यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले, शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या, राधानगरी धरण बांधले ,कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे बांधले, समाजातील रंजल्या गांजल्या लोकाबद्दल त्यांना कणव होती, त्यांचे मन फार मोठे होते, लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण कसे धाव घेतात त्याचप्रमाणे लोक महाराजांकडे धाव घेत होते ,शाहु महाराज हे वारसा हक्काने राज्य नव्हते तर ते लोकांचे राजे होते , शाहू महाराजांना लोक पारखण्याची कला अवगत होती. त्यानी मल्ल विद्येला प्रोत्साहन दिले,त्यांनी वतनदारी पद्धती नष्ट केली ,शाळा, महाविद्यालये, वस्तीगृह काढून सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, दररोज पाटलांना वर्दी देणाऱ्या लोकांना बंद करून टाकले, शाहु महाराजांनी वेठबिगारी कायमचीच बंद करून टाकली या पद्धतीमुळे कामगार लोकावर जबरदस्ती जुलूम केला जात असे.यामुळे समाजातील लोक आपण माणूस आहोत हे विसरून गेले होते तसेच शाहू महाराजांना फसवण्या साठी एक ज्योतिषी दरबारात आला आणि तो काहीही भविष्य सांगू लागला.त्यावेळेस महाराजांनी त्याला डांबून ठेवले आणि आता खरं भविष्य सांग म्हणून त्याचा पडदापार्श केले. गोव-या विकणाऱ्या महिलेला प्रामाणिक पणाबद्दल शाबासकी दिली, त्यामुळे ते मोठ्या दिलाचे राजे होते, म्हणूनच त्यांना समतेचे पुरस्कर्ते असेही म्हणतात. राजर्षी शाहू महाराजांचा 6 मे 1922 रोजी निधन झाले. गेल्या वर्षी शाहू स्मृती शताब्दी संपूर्ण देशात साजरी करण्यात आली.
.पुरोगामी विचाराचे व आचारांचे अधिष्ठान अमर झाले, माणसातील राजा जरी गेला तरी शैक्षणिक
,सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती अमर झाली. त्यांना
जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन

 

*शब्दांकन*
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी ,ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *