जरा लाडात आणि थोडं प्रेमात येउन त्याने तिला मिठीत घेउन म्हटलं, गोडुली आहेस.. गोडुली म्हटलं चालेल ना ??
त्याच्या मिठीत असताना तिच्या तोंडुन शब्द फुटत नव्हते.
तिने अजुन त्याला घट्ट मिठीत घेतलं आणि काहीही न बोलता त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला..
खरं तर चाळीशीतील ते प्रेम ..ती म्हणाली , सोनल गोडबोले यांच्या बियॉन्ड सेक्स कादंबरीतील मीरा सागर यांच्यासारखं प्रेम हवं .. आपण करायचं कारे ?? .. खरं तर त्याने ती कादंबरी वाचलीच नव्हती त्यामुळे तो बिचारा काय उत्तर देणार.. म्हणजे कसं गं गोडुली ?? .. या त्याच्या प्रश्नावर तिने बोलायला सुरुवात केली..म्हणजेच शरीरापलिकडचे प्रेम रे ,
सुंदर ,अलगद ,हळुवार ,मुलायम , शेवरीच्या कापसासारखं हलकं आणि स्वच्छ , बकुळीसारखं गंधीत , २४ कॅरट सोन्यासारखं ,, लाजाळूच्या पानासारखं, अळवाच्या पानावरील दवबिंदुसारखं , मृत्तिकागंधासारखं ,,
गोडुली तुझ्या या बोक्याला समजेल असं बोल की.. आता जे काय तु बोललीस ते खूपच सुंदर आणि रोमांचीत होतं पण माझ्या हृदय , मन ,शरीर याच्यापलीकडचं होतं.. अरे मग तेच तर आपल्याला करायचं आहे.. त्याने तिच्या कपाळावर किस केला.. तिच्या कानाला हळुवार चावा घेतला , तिच्या डोळ्यांना त्याच्या ओठानी मुलायम स्पर्श केला आणि हातात हात घेत म्हणाला ,असं का गं ??तिने पुन्हा एक कटाक्ष टाकला आणि त्याच्या मिठीत गेली..
त्याला कळेना , सोनल गोडबोले यांनी नक्की कादंबरीत काय लिहीलं असेल ??.. ही लेखक मंडळी पण ना आमचं सगळं अवघड करुन ठेवतात.. यांचे शब्दही बोलतात आणि ही गोडुली सागर सारखं प्रेम हवं म्हणते.. विचारलं तर शब्दांचे मनोरे रचते.. तिने पर्स उघडली , त्याच्या हातावर बियॉन्ड सेक्स कादंबरी ठेवली आणि म्हणाली ,वाच आणि मग आपण भेटू.. तिच्या प्रेमासाठी त्याच्याकडे पर्याय नव्हता.. त्याने तिला ड्रॉप केलं आणि कारमधे बसुन कादंबरी चाळु लागला.. एक एक प्रसंग पुढे जात राहिला आणि अडीच तासाने त्याच्या लक्षात आलं आपण अजून कारमधेच आहोत.. त्याने गोडुलीला फोन केला आणि म्हणाला ,,अता कॉफी ला भेटतेस का ??.. ती म्हणाली ,, काय झालं ३ तासापूर्वी आपण एकत्र होतो आणि पुन्हा ??.. आठवण येतेय कारे बोक्या ??.. तु येगं पटकन आवरुन … मी वाट पहातोय..
गोडुली खुश झाली .. जवळपास उड्या मारतच गाडीपाशी पोचली.. त्याने तिला हातात गुलाब दिलं आणि डायरेक्ट कॉफी शॉपला नेलं.. तिचा हात हातात घेत म्हणाला ,Goduli extremely sorry dear .. तिला काही कळेना .. तो म्हणाला , मला वाटलं होतं , तुझ्यासोबत सेक्स करावा पण पुस्तक वाचताना जाणवलं की सेक्स करुन मी कदाचित खुप मोठी चुक केली असती कारण sex is a not lv.. it is part of lv आणि विशेष म्हणजे सेक्स हा शेवटचा टप्पा आहे पण आपण तो सुरुवातीलाच पार करतो आणि रोमान्स , हग , किस , मिटीतील मिठास , ती देवाणघेवाण सगळं सगळं सेकन्डरी धरतो.. खुप मोठी चुक मी माझ्या आयुष्यात करणार होतो पण नीव्वळ मीरा आणि सागरमुळे मला प्रेमाचा खरा अर्थ समजला..
हे सगळं मी फक्त शब्दातीत केलय.. काल दुपारी माझे हेच वाचक मला प्रत्यक्षात भेटले होते आणि त्यांनी ही घटना माझ्यासोबत शेअर केली होती.. एक सुंदर गिफ्ट देउन त्यांनी माझी कृतज्ञता पण व्यक्त केली.. मला वाटतय मी इथेच थांबावं .. तुम्ही वाचकानी यावर जरूर विचार करावा..
सोनल गोडबोले