२१ व्या अमरनाथ यात्रेला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ७१ यात्रेकरूंचा पहिला जत्था दि.३० जून रोजी रवाणा होणार

नांदेड ; प्रतिनिधी

२१ व्या अमरनाथ यात्रेला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ७१ यात्रेकरूंचा पहिला जत्था शुक्रवार दि.३० जून रोजी सकाळी साडेदहा वाजता हमसफर एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्थानकावरून रवाना होणार असून यात्रेदरम्यान खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेकांनी प्रत्येकी एका भोजनाची व्यवस्था केली आहे.

 

अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने दोन महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात. अशा प्रकारची तयारी भारतात फक्त नांदेडमध्येच अमरनाथ यात्री संघातर्फे करण्यात येते.१३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, दिल्ली, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणाऱ्या यात्रेत अनेक दानशूर नागरिक अन्नदान करतात.खा. चिखलीकर,
सतीश सुगनचंदजी शर्मा,
डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, प्रतिमा राजेंद्र चौधरी परभणी, मनोज शर्मा नागपूर,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,ज्ञानोबा जोगदंड जम्मू,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,ओमप्रकाश पाम्पटवार,सरदार जागीरसिंघ अमृतसर,हास्य कवि सरदार प्रताप फौजदार हे दरवर्षी
प्रत्येकी एका भोजनाची व्यवस्था करतात.

याशिवाय अशोक जायस्वाल पूर्णा,स्नेहलता जायसवाल हैदराबाद,शेंदूरवाडकर व रावके,प्रदीप शुक्ला भोपाळ,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना यांनी एका ठिकाणी अल्पोहाराची व्यवस्था केली आहे. नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघातर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *