अहमदपूरात आज वसंतराव नाईक चौक नामफलकाचे अनावरण

 

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

 

येथील टेंभुर्णी रोडवरील, साईनगरात आज दि ०१ जुलै २३ रोजी वसंतराव नाईक यांच्या ११० व्या जयंती निमित्त वसं.तराव नाईक चौक नामफलकाचे अनावरण आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सकाळी ११ : ०० वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवानसिंह राजपूत, अध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा धर्मपाल गायकवाड ( शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार विजेते ) मा अनंतराव कदम ( सदस्य, छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप ) मा नाथराव राठोड ( अध्यक्ष बंजारा समाज परिवर्तन अभियान ) मा राजेंद्र कांबळे ( अध्यक्ष बोद्धीसत्व फाऊंडेशन ) मा शेषराव राठोड ( सरपंच, नांदुरा खु ) मा अमितभय्या रेड्डी ( युवा नेते ) मा चंद्रकांत राठोड ( सरपंच वरवंटी ) मा मा संतोष राठोड ( अध्यक्ष गोरसेना उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजक वसंतराव नाईक ग्रामीण विकास, लोकसेवा संस्था आहे.नामफलकाच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक एन डी राठोड आणि गणेश चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *