कापूस व सोयाबीन कीड व्यवस्थापन आणि पेरणी पूर्व मार्गदर्शन

 

कंधार ; प्रतिनिधी

कापूस व सोयाबीन कीड व्यवस्थापन आणि पेरणी पूर्व मार्गदर्शन सोहळा 2023 लक्ष्मी कृषी सेवा केंद्र कुरुळा व सौरुप ऍग्रो केमिकल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने, शेतकरी मार्गदर्शन शिबिर मौजे. कुरुळा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे दिनांक 01 जुलै 2023 रोजी लहुजी साळवे चौक अहमदपूर कुरुळा येथे आयोजित करण्यात आले.

गावकऱ्यांना शेतकरी मार्गदर्शन सोहळा अत्यंत उपयुक्त ठरला व हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.एच.एम नाईकवाडे नाशिक, प्रमुख मार्गदर्शक माननीय दिपाली मोरे नाशिक, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड, समतादूत विनोद पाचंगे, नांदेड, आकाश भेंडेकर यांच्यासह गावातील असंख शेतकरी बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त शिवाजी कोंडीबा टोम्पे यांनी केले तर आभार लक्ष्मी कृषी सेवा केंद्र संचालक अजय शिवाजीराव टोपे यांनी मांडले..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *