अहमदपूर ; ( प्रा .भगवान आमलापुरे ) (दि.30.06.23)
आज बदललेल्या जीवनशैलीमध्ये सगळीकडे बदल झालेला असताना पण शिक्षकांचे कार्य अनादी कालापासून दीपस्तंभ सारखे प्रेरणादायी असून शिक्षक म्हणजे समाजातील चालते बोलते विद्यापीठ असल्याचे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले.
ते दि. 30 रोजी संस्कृती मंगल कार्यालयात यशवंत विद्यालया चे उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. गणपतराव माने, डॉ एस एस एम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ सुनिताताई चवळे, पंचायत समितीचे केंद्रप्रमुख नंदकुमार कोणाले, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले, माजी नगरसेवक अभय मिरकले, पंचायत समितीचे माजी सदस्य कमलाकर पाटील, प्राचार्य व्ही व्ही गंपले, माजी सरपंच रामराव दळवी, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी म्हणाले माजी मंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला क्रीडा क्षेत्रासोबत इतरही शैक्षणिक क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे असे जाहीर आवाहन केले.
यावेळी सत्कार संयोजन समितीच्या वतीने श्रीयुत उमाकांत नरडेले , सौ सिंधुताई नरडेले, यांचा टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळाने पुष्पहार भर आहेर देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डी बी लोहारे गुरुजी, डॉ अशोक सांगवीकर, प्रा.गणपतराव माने, प्रा.सुनिताताई चवळे,शिवानंद हेंगणे, सहशिक्षक राम तत्तापुरे, धनंजय तोकले, माजी विद्यार्थी अमित बिलापट्टे सत्कार मुर्ती उमाकांत नरडेले यांचे मनोगत पर भाषणे झाली.
प्रास्ताविक प्राचार्य व्ही व्ही गंपले यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले.
या सत्कार सोहळ्याला उपप्राचार्य गिरीधर घोरबांड, पर्यवेक्षक गजानन शिंदे , केशवराव केंचे, डॉ. विपुल नरडेले यांच्यासह विविध शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.