नांदेड – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनाची भक्तांना नेहमीच ओढ असते. ही बाब लक्षात घेवून काँग्रेसचे शिराढोण येथील कार्यकर्ते बालाजी रामराव पांडागळे यांनी गावातील 70 विठ्ठल भक्तांना मोफत दर्शन घडवून आणले.
शासकीय ठेकेदार असलेले बालाजी पांडागळे हे धार्मिकवृत्तीचे दानशूर व्यक्ती म्हणून शिराढोण परिसरात परिचित आहेत. मागील दोन वर्षांपासून आषाढी एकादशिनिमित्ताने शिराढोण परिसरातील विठ्ठल भक्तांना पंढरपूरला दर्शनासाठी घेवून जातात. याही वर्षी त्यांनी गावातील 70 भक्तांना स्वखर्चाने दर्शनासाठी नेले. या सर्व भक्तांचे आषाढी एकादशीच्या दिवशीच दर्शन झाले. त्यामुळे या सर्व भक्तांनी बालाजी पांडागळे यांचे आभार मानले. त्यांचा हा उपक्रम मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण सुरु आहे.