नांदेड ; प्रतिनिधी
वसंतराव नाईक यांची जयंती कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे आज दिनांक: 01/07/2023, शनिवारी साजरी करण्यात आली. याप्रसंगी सांस्कृतिक प्रमुख व्ही.डी.बिरादार सरांनी आपले मनोगत मांडले. वसंतराव नाईकांच्या जन्म, त्यांचे बालपण, त्यावेळी चार मैल चालून झालेले शिक्षण, त्यांची वास्तव्य त्यांच्या कुटुंबाचा इतिहास विस्तृतपणे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. समाजाविषयीची तळमळ, वकिली व्यवसायातून गोरगरिबांची कामे, अनेक समाजसुधारकांच्या पुस्तकाचे वाचन करून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केले. 1956 साली महसूल मंत्री म्हणून मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. एवढ्यावरच न थांबता 1963 साली मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तब्बल बारा वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले. एक सामान्य माणूस एका तांड्यावरून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारता आली. ती केवळ शिक्षणामुळेच ! म्हणून आपणही सर्वांनी उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन अशा अनेक थोर नेत्यांची विचार आत्मसात करून समाजाची सेवा आपल्या हातून घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केले. अशा थोर नेत्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित