आषाढी एकादशीच्या निमित्याने चिमुकल्याची वेशभूषा ; कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत वेशभूषा कार्यक्रम

 

कंधार ;आषाढी एकादशीच्या औचित्याने कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत बालवाडी वर्गातील चिमुकल्यांनी विठ्ठल रुकमिणीची वेशभूषा साकारली .

 

संत गाडोबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत विविध उपक्रमाचे अयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा प्रा डी. एन केंद्रे साहेब व सचिव चेतन भाऊ दौलतराव केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात येतात . आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील चिमुकल्यांनी वेशभुषा केली होती . बालवाडीच्या शिक्षीका बालकताई चंद्रकला तेलंग यांनी सदरील वेशभुषेचे नियोजन केले होते .

 

महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी. जी यांनी सदरील वेशभुषा केलेल्या चिमुकल्पाचे कौतूक केले . यावेळी शिक्षीका सौ उषा कागणे , आनंदा आगलावे , राजु केंद्रे यांची उपस्थिती होती .

 

 

 

कृषीदिनी कै वसंतराव नाईक यांना अभिवादन

आज दि १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून राज्याचे माजी मुख्यमंत्री कै वंसतराव नाईक यांच्या जयंती निमित्त शाळेत अभिवादन करण्यात आले .

यावेळी मुख्याध्यापक वाघमारे डी. जी ,शिक्षीका सौ उषा कागणे , आनंदा आगलावे , राजु केंद्रे ,बालकताई चंद्रकला तेलंग आदीची उपस्थिती होती .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *