मुख्याध्यापिका सुमन सोनकांबळे यांच्या सेवापुर्ती निमित्ताने शालेय साहित्याचे वाटप

 

नांदेड- दक्षिण विभागातील शेवडी बा. केंद्रातील जि. प . प्रा. शा. बामणी प. उ. या शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सोनकांबळे यांच्या नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्तीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या आदी शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सोनकांबळे यांनी आपल्या विद्यार्थ्याप्रति असलेल्या जिव्हाळ्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास एक दप्तर व लेखनासाठी वह्या असे साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांविषयी आपुलकीची भावना दाखवून दिली.

याप्रसंगी सरस्वती अंबलवाड ( शिक्षण विस्तार अधिकारी बीट: सुनेगाव ), नागोराव जाधव ( केंद्रप्रमुख ,शेवडी बा.), आनंदा नरवाडे सर ( केंद्रीय मुख्याध्यापक शेवडी बा.) गावचे सरपंच पांडुरंग जाधव, खुशाल पाटील जाधव (उपसरपंच), शिवप्रसाद विश्वास ( शा. व्य. स. अध्यक्ष), हिरामण जाधव ( शा. व्य. स. उपाध्यक्ष ), नावले गुरुजी (शिक्षणप्रेमी नागरिक ), विश्वंभर जाधव (माजी सैनिक), पूजा जाधव ( ग्रामपंचायत सदस्या ), नामदेव कांबळे ( माजी पोलीस निरीक्षक ), नितीन कांबळे, वैशाली कांबळे, रामराव येंगडे ( माजी मुख्याध्यापक), बळीराम येंगडे, प्रस्तुत शाळेचे शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वाटप व वह्या देण्यात आल्या.

याप्रसंगी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी अंबलवाड यांनी सुमन सोनकांबळे ह्या आपल्या मातृतुल्य व्यक्तिमत्त्व आहेत असे नमूद केले. तर केंद्रप्रमुख नागोराव जाधव यांनी मॅडम म्हणजे फुलाप्रमाणे कोमल व विद्यार्थ्यांसाठी सोन्याप्रमाणे झिजणारे व्यक्तिमत्त्व आहेत असे विचार व्यक्त केले. केंद्रीय मुख्याध्यापक आनंद नरवाडे यांनी सोनकांबळे यांच्या मेहनत व कार्यकुशलता याविषयी आपले मत नमूद केले. सर्व उपस्थितांनी सोनकांबळे यांना भावी आयुष्यासाठी शुभकामना देऊन सेवापुर्तीचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *